Karnataka CM Oath Ceremony: सिद्धरमय्या मुख्यमंत्री, डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री, कर्नाटकमध्ये काँग्रेसचा आज भव्य शपथविधी सोहळा; कोणकण राहणार उपस्थित घ्या जाणूनमंत्रीपदाची शपथ
Karnataka Congress Leaders

Karnataka CM Oath Ceremony: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 224 पैकी 135 जागा मिळाल्याने सत्ता स्थापनेचा दावा केला. कर्नाटकात सिद्धरामय्या आणि डी. के शिवकुमार यांची अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्यानंतर आज हे दोघेही मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. बंगलोरच्या कांतिवीरा स्टेडियममध्ये आज हा शपथविधी सोहळा होणार आहे. यावेळी काँग्रेसचे इतर आठ मंत्री हे कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणार आहे. या निवडणुकीत विजयानंतर काँग्रेसने विरोधकांची मुठ बांधण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टेलिन उपस्थित राहणार आहेत.

मंत्रिपदाची शपथ घेणारे आठ आमदार या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची पुष्टी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार्‍या आमदारांमध्ये डॉ जी परमेश्वर, केजे जॉर्ज, के एच मुनिप्पा, सतीश जारकीहोली, जमीर अहमद, रामलिंगा रेड्डी, प्रियांक खर्गे आणि एमबी पाटील यांचा समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सुरुवातीला, कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर, डीके शिवकुमार यांनी 2019 मध्ये त्यांचे सरकार पडल्यानंतर पक्षाची पुनर्बांधणी आणि काँग्रेसला मोठ्या जनादेशाकडे नेण्यासह, गेल्या पाच वर्षांतील त्यांच्या कामाचा उल्लेख करून सर्वोच्च पदासाठी आग्रह धरला होता.  दरम्यान, सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्रीपदासाठी आमदारांच्या पाठिंब्यावर आणि त्यांच्या लोकप्रियतेवरुन निवड करण्यात आली.

नवीन मुख्यमंत्री-नियुक्त सिद्धरामय्या हे गेल्या 40 वर्षांत पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ करणारे कर्नाटकचे पहिले मुख्यमंत्री होते. देवराज उर्स नंतर दक्षिणेकडील राज्याच्या इतिहासात असे करणारे ते दुसरे मुख्यमंत्री आहेत. 10 मे रोजी झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने निर्णायक जनादेश मिळवला, 224 पैकी 135 जागा जिंकून भाजपला सत्तेतून बाहेर काढले. भाजप 66 जागांसह दुस-या क्रमांकावर होता आणि किंगमेकरची भूमिका निभावण्याची आशा असलेल्या JD(S) फक्त 19 जागांसह घसरली.