Ramon Magsaysay Award 2019: पत्रकार रवीश कुमार यांना यंदाचा 'रॅमन मॅगसेसे' पुरस्कार; पत्रकारितेतील योगदानाबद्दल गौरव
Senior Journalist Ravish Kumar | (Photo Credit: Twitter)

ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार (Ravish Kumar) हे यंदाचे रॅमन मॅगसेसे पुरस्कार (Ramon Magsaysay Award) विजेते ठरले आहेत. अतिशय प्रतिष्ठेचा तसेच, अशिया खंडातील नोबेल अशी रॅमन मॅगसेसे (Ramon Magsaysay Award 2019) पुरस्काराची ओळख आहे. यंदाचा हा पुरस्कार विजेता ठरणाऱ्या एकूण पाच लोकांपैकी रवीश कुमार हे एकमेव भारतीय आहेत. रवीश कुमार यांचा एनडीटीव्ही या खासगी वृत्तवाहीनीवर नियमीत प्रसारीत होणारा 'प्राइम टाईम' हा कार्यक्रम नेहमी चर्चेत असतो.

रवीश कुमार यांच्यासोबत म्यानमार चे को सी विन, थायलंड देशाच्या अंगहाना नीलपाइजित, फिलिपींस देशाचे रमेंड आणि दक्षिण कोरिया देशाचे किम जोंग की यांचीही या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. रॅमन मॅगसेसे अवार्ड फाउंडेशन ने म्हटले की, रवीश कुमार यांचा प्राइम टाइम हा कार्यक्रम लोकांच्या वास्तव मुद्द्यांवर आणि सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधत्व करतो. (हेही वाचा, Nobel Prize 2018 : भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर; 55 वर्षांनतर एका महिला शास्त्रज्ञाची वर्णी)

ट्विट

अशिया खंडातील व्यक्ती, संस्था आदींना त्यांच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार रॅमन मॅगसेसे पुरस्कार फाउंडेशन द्वारा फिलीपीन्स देशाचे माजी राष्ट्रपती रॅमन मॅगसेसे यांच्या स्मरणार्थ दिला जातो. हा पुरस्कार एकूण 6 श्रेणिंमध्ये दिला जातो. शासकीय सेवा, सार्वजनिक सेवा, सामुदायिक नेतृत्व, पत्रकारिता आणि साहित्य, शांती आणि उगवते नेतृत्व अशा त्या श्रेणी आहेत.