
जर तुम्ही रेल्वेत नोकरीची संधी शोधत असल्यास ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण दक्षिण रेल्वेमध्ये 3500 पेक्षा अधिक रिक्त जागांवर नोकर भरती करता येणार आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने 10 वी उत्तीर्ण केलेली असावी. या पदांसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदरांना अप्रेंटिसशिप ट्रेनिंगसाठी पाठवण्यात येणार आहे. दक्षिण रेल्वेकडून एक नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
रेल्वेत नोकर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना दक्षिण रेल्वेच्या sr.indianrailways.gov.in येथे जाऊन अधिक माहिती मिळणार आहे. मात्र अर्ज करण्यापूर्वी त्याबाबत जाहीर केलेले नोटिफिकेशन नीट वाचावे. त्यामुळे पुढे जाऊन कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये. या नोकर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तर दहावी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना 50 टक्के गुण असणे अनिवार्य आहे. तसेच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय कोर्स बाबत माहिती असणे ही महत्वाचे आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 ते 22 वर्ष असावे. आरक्षण वर्गानुसार उमेदवारांना सूट देण्यात येणार आहे.
तसेच दक्षिण रेल्वेत नोकर भरती 7व्या वेतन आयोगानुसार करण्यात येणार असून लेवल 2 आणि 5 अंतर्गत वेतन दिले जाणार आहे. या पदासाठी नोकर भरती सुरु करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2019 आहे. या पदासाठी अंतर्गित एथलेटिक्स (पुरुष)-5, एथेलेटिक्स (महिला)-2, चेस (पुरुष)-1, चेस (महिला)- 3 यासह स्विमींग, वेटलिफ्टिंग, टेबल टेनिस पदासाठी सुद्धा नोकर भरती करण्यात येणार आहे.