सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण भारतीय रेल्वेत नोकरीची संधी उपलब्ध झाली असून त्याअंतर्गत विविध पदांसाठी नोकर भरती करण्यात येणार आहे. दक्षिण भारतीय रेल्वेत रिक्त जागांवर उमेदवारांची निवड केली जाणार असून त्यांना अर्ज या scr.indianrailways.gov.in संकेतस्थळावर जाऊन भरावा लागणार आहे. या नोकरभरीमध्ये स्पोर्ट्स कोटा मध्ये नोकर भरती करण्यात येणार असून सातव्या वेतन आयोगानुसार वेतन दिले जाणार आहे.
दक्षिण रेल्वेत नोकर भरती 7व्या वेतन आयोगानुसार करण्यात येणार असून लेवल 2 आणि 5 अंतर्गत वेतन दिले जाणार आहे. या पदासाठी नोकर भरती सुरु करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2019 आहे. या पदासाठी अंतर्गित एथलेटिक्स (पुरुष)-5, एथेलेटिक्स (महिला)-2, चेस (पुरुष)-1, चेस (महिला)- 3 यासह स्विमींग, वेटलिफ्टिंग, टेबल टेनिस पदासाठी सुद्धा नोकर भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर याबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे.(खुशखबर! 1 डिसेंबरपासून सॅमसंगकडून भारतात मेगाभरती, इंजिनीअर विद्यार्थ्यांसाठी संधी; जाणून घ्या भरती प्रक्रिया आणि विभाग)
नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन दिले जाणार आहे. मात्र लेवल 2 आणि लेवल 3 अनुसार वेतन मिळणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता 12 वी पास अनिवार्य आहे. तर लेवल 4 आणि लेवल 5 अंतर्गत वेतन मिळाऱ्यांना पदवीधर असणे आवश्यक आहे. मात्र या नोकर भरतीमध्ये कोणत्याही प्रकारचे आरक्षण लागू करण्यात येणार नाही आहे. लेवल 2 पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना 19900, 3 लेवल पदासाठी 21700, लेवल 4 साठी 25500, लेवल 5 पदांसाठी 29200 रुपये वेतन दिले जाणार आहे.