Citizen Amendment Bill: तुम्ही ज्या शाळेत शिकता त्या शाळेचे आम्ही हेडमास्टर; शिवसेना खासदार संजय राऊत यांचा भाजपला टोला
Sanjay Rau | (Photo Credits: ANI)

Citizen Amendment Bill: तुम्ही ज्या शाळेत शिकता त्या शाळेचे आम्ही हेडमास्टर आहोत आणि शिवसेना (Shiv Sena) प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Bal Thackeray) , माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे आमचे हेडमास्टर होते असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला लगावला आहे. लोकसभा सभागृहानंतर राज्यसभा (Rajya Sabha) सभागृहात नागरिकत्व दुरुस्थी विधेयकावर जोरदार चर्चा सुरु आहे. विविध राजकीय पक्ष विधेयकाच्या बाजूने आणि विधेयकाच्या वरोधात मत प्रदर्शन करत आहे. सत्ताधारी भाजपचा एकेकाळचा मित्र शिवसेना पक्षानेही राज्यसभेत आपली बाजू मांडली. शिवसेना नेते संजय राऊत हे नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर शिवसेनेच्या वतीने बाजू मांडत होते. दरम्यान, शिवसेना या विधेयकाच्या बाजूने आहे की, विरोधात हे मात्र राऊत यांनी स्पष्ट केले नाही.

राज्यसभा सभागृहात बोलताना भारतीय जनता पक्षावर निशाणा साधत संजय राऊत म्हणाले, आम्ही असे ऐकले आहे की, जे लोक या वधेयकाला विरोध करतात ते देशद्रोही आहेत किंवा पाकिस्तानी आहेत. जे या विधेयकाचे समर्थन करतात दे देशभक्त आहेत. आम्ही स्पष्ट करतो की, आम्हाला (शिवसेना) कोणी देशभक्तीचे प्रमाणप देण्याची गरज नाही. आम्ही आपल्यापेक्षा चांगल्या पद्धतीने देशभक्ती जानतो आणि देशभक्त आहोतही. परंतू, देशातून मोठ्या प्रमाणावर आज या विधेयकाचा विरोध होत आहे. या विधेयकाला विरोध करण्यासाठी हिंसाचार होत आहे. हे सर्व लोक देशाचे नागरिक आहेत. देशाचे विरोधक नाहीत. त्यामुळे कोणी कोणाला देशभक्तीचे प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही.

एएनआय ट्विट

एएनआय ट्विट

पुढे बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, पाकिस्तान, बांग्लादेश, अफगानिस्तान येथे ज्याअल्पसंख्याकांवर जो अत्याचार झाला आहे, त्यांचा आपण मानवतेच्या दृष्टीकोनातून स्वीकार करायला हवा. पण, आम्ही ज्यांचा स्वीकार करतो त्यांच्या नावाने राजकारण होता कामा नये. त्यांना रोटी, कपडा, मकान अशा आवश्यक गोष्टी द्यायच्या आहेत तर देऊ शकतो. त्यांना रोजागारही देता येईल. परंतू, असे लोक किती आहेत?.. लाखो.. करोडो. लोक जर आपण घेऊन येत असाल तर, त्यांच्या राहण्याची, रोजागाराची सोय कुठे करणार आहात? त्यांना मतदानाचा हक्क मिळेन काय? हेही सरकारने स्पष्ट करावे, असे राऊत म्हणाले. (हेही वाचा, नागरिकत्व दुरुस्ती विधेयक: केंद्र सरकारची कसोटी, भाजपची मदार मित्रपक्षांवर; शिवसेना, जनता दल देणार का सरकारला साथ?)

दरम्यान, लोकसभा सभागृहात शिवसेने नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दिला. तसेच, या विधेयकाच्या बाजूने मतदानही केले. राज्यसभेत मात्र शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली नाही. या विधेयकावर आपली भूमिका शिवसेनेने तटस्थ ठेवल्याचे संजय राऊत यांच्या भाषणातून स्पष्ट झाले. मात्र, प्रत्यक्ष मतदानावेळी शिवसेना काय भूमिका घेते याबाबत उत्सुकता आहे.