Rajasthan Political Crisis: उपमुख्यमंत्री पदावरून हटवल्यानंतर सचिन पायलट यांनी Twitter Bio मध्ये केला 'असा' बदल (See Pic)
Sachin Pilot | (Photo Credits: ANI)

राजस्थानच्या उपमुख्यमंत्री पदावरून हटवल्यानंतर कॉंग्रेस नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरील बायो (Twitter Bio) मध्ये बदल केला आहे. राजस्थानच्या उपमुख्यमंत्री पदावर असताना सचिन पायलट यांचे ट्विटरवरील बायो होते- 'राजस्थान उपमुख्यमंत्री | अध्यक्ष, राजस्थान काँग्रेस | माजी मंत्री माजी आयटी, दूरसंचार व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री, भारत सरकार | कमिशनड ऑफिसर टेरिटोरियल आर्मी.' (Deputy Chief Minister of Rajasthan | President, Rajasthan Congress | Former Minister of IT, Telecom & Corporate affairs,GoI | Commissioned officer Territorial Army) आता उपमुख्यमंत्री पदावरुन हटवल्यानंतर सचिन पायलट यांच्या ट्विटर बायो मध्ये केवळ 'टोंकचे आमदार | माजी मंत्री माजी आयटी, दूरसंचार व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री, भारत सरकार | कमिशनड ऑफिसर टेरिटोरियल आर्मी' (MLA from Tonk| Former Minister of IT, Telecom & Corporate affairs,GoI |Commissioned officer Territorial Army) इतकंच दिसत आहे.

उपमुख्यमंत्री पदावरुन हटवल्यानंतर सचिन पायलट यांनी ट्विटर बायो मधूनही उपमुख्यमंत्री पद काढून टाकले आहे. पूर्वीच्या आणि आताच्या ट्विटर बायोचे फोटोज ANI या वृत्तसंस्थेने ट्विट केले आहेत. तुम्हीही पहा या दोन ट्विटर बायो मधील फरक. (Rajasthan Political Crisis: पायलट नसताना मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या नेतृत्वात राजस्थान काँग्रेस सरकारचे विमान अस्थिर)

ANI Tweet:

सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री पदासोबतच राजस्थान काँग्रेस चीफ या पदावरूनदेखील हटवण्यात आलं आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री पदावरुन हटवण्यात आल्यानंतर सचिन पायलट यांनी 'सत्य को परेशान किया जा सकता है पराजित नहीं' असे ट्विट करत आपली पहिली प्रतिक्रीया नोंदवली.

सोमवारी राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री यांनी एक व्हिडिओ रिलीज केला होता. या व्हिडिओमध्ये सचिन पायलट यांना पाठींबा देणारे सर्व आमदार हरियाणाच्या मानसर येथील एका रिसोर्टमध्ये एकत्रित झाल्याचे पाहायला मिळत होते. परंतु, या नंतर CLP ने संपूर्ण 107 आमदारांचा पाठींबा असल्याचे घोषित केले होते. सध्याच्या परिस्थिती मुख्यमंत्री अशोक गहेलोत यांना 100 आमदारांचा पाठींबा आहे. मात्र सचिन पायलट यांच्या हकलपट्टीनंतर राजस्थानचे राजकारण काय वळण घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.