Sabarimala Temple:  बिंदू आणि कनकदुर्गा यापूर्वी 3 मलेशियन आहेत शबरीमला मंदिरामध्ये प्रवेश करणाऱ्या पहिल्या महिला, केरळ पोलिसांची माहिती
Sabarimala Temple Devotees (Photo Credits: PTI)

Sabarimala Temple: सर्वोच्च न्यायालयाने महिलांसाठी केरळच्या शबरीमला (Sabarimala Temple) मंदिराची दारं खुली केल्यानंतर स्थानिक लोकांनी या निर्णयाला विरोध केला आहे. 2 जानेवारीला बिंदू (Bindu) आणि कानकदुर्गा (Kanakadurga) या मासिक पाळी सुरु असलेल्या टप्प्यातील महिलांनी प्रवेश केल्यानंतर सध्या केरळमध्ये हिंसाचार पेटला आहे. मात्र या महिलांपुर्वीच नववर्षाच्या पहिल्या दिवशी मूळ तमिळ असणाऱ्या तीन मलेशियन महिलांनी (Malaysian Women ) प्रवेश केल्याची माहिती आता समोर आली आहे. त्याचे चेहरे झाकलेला व्हिडीओ आहे.

केरळ पोलिसांच्या सूत्रांची टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारीच्या पहाटे 3 मलेशियन महिलांनी मंदिरात प्रवेश केला. दहाच्या सुमारास त्या खाली आल्या. मलेशियन महिलांनी मंदिराला भेट दिल्याचे वृत्त पोलिसांनी दिले असले तरीही दर्शन घेतले की नाही याची माहिती दिलेली नाही. मलेशियन महिलांची कोणतीच ओळख पोलिसांनी जाहीर केलेली नाही. मलेशियाच्या तमिळ भाविकांच्या 25 जणांच्या ताफ्यामध्ये त्यांचाही समावेश होता.  केरळच्या Sabarimala Temple बद्दल या '11' इंटरेस्टिंग गोष्टी वाचून तुम्ही थक्क व्हाल!

2 जानेवारीच्या रात्रीपासून बिंदू आणि कानकदुर्गा या चाळिशीतील महिलांनी पायर्‍या चढायला सुरूवात केली पहाटे 3:45वाजता अय्यापाचं दर्शन घेतलं. शबरीमला मंदिरामध्ये महिलांनी प्रवेश केल्याची माहिती समजताच सध्या मंदिर शुद्धीकरणासाठी बंद करण्यात आलं आहे. त्यानंतर एका श्रीलंकन महिलेने देखील मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता मात्र पोलिसांनी तिला वाटेतच रोखलं.

शबरीमला मंदिर आणि महिलाप्रवेश यावरून केरळमध्ये हिंसाचार पेटला आहे. शबरीमला मंदिर हे 'अयप्पा'चं (Lord Ayyappa) मंदिर आहे. या मंदिरात केवळ 10 वर्षाखालील आणि 60 वर्षावरील स्त्रियांना, मुलींना प्रवेश आहे. म्हणजेच या मंदिरात मासिकपाळी येणार्‍या वयोगटातील कोणत्याच महिलेला प्रवेश नाही. अशी शेकडो वर्षांची परंपरा आहे.