केरळच्या Sabarimala Temple बद्दल या '11' इंटरेस्टिंग गोष्टी वाचून तुम्ही थक्क व्हाल!
File image of the Sabarimala Temple | (Photo credits: Wikimedia Commons)

Sabarimala Temple: मागील तीन महिन्यांपासून केरळमधील शबरीमला मंदिर(Sabarimala Temple) चर्चेमध्ये आहे. या मंदिरात प्रौढ महिलांना प्रवेश देण्यावरून मंदिर परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. आज पहाटे चाळीशीच्या वयातील दोन महिलांनी सारा विरोध झुगारून पहाटे मंदिर परिसरात प्रवेश करून सुमारे 1500 वर्ष जुनी परंपरा मोडीत काढली. त्यानंतर मंदिर 'शुद्धीकरणा'साठी बंद करण्यात आलं होतं. अयप्पाचं  (Lord Ayyappa) हे शबरीमला मंदिर (Sabarimala Temple) नेमकं आहे तरी कसं? या मंदिराचा इतिहास काय ? स्थानिकांचा या मंदिरात स्त्रियांच्या प्रवेशाला नेमका विरोध का ? या तुमच्या मनातील सार्‍या प्रश्नांची उत्तरं नक्की जाणून घ्या.

केरळच्या शबरीमला मंदिराबाबत (Sabarimala Temple) काही आश्चर्यजनक गोष्टी

 • शबरीमला मंदिर हे 'अयप्पा'चं (Lord Ayyappa) मंदिर आहे. या मंदिरात केवळ 10 वर्षाखालील आणि 60 वर्षावरील स्त्रियांना, मुलींना प्रवेश आहे. म्हणजेच या मंदिरात मासिकपाळी येणार्‍या वयोगटातील कोणत्याच महिलेला प्रवेश नाही.

 

View this post on Instagram

 

🙏🏻🙏🏻 സ്വാമിയേ ശരണമയ്യപ്പ 🙏🏻🙏🏻

A post shared by Sabarimala Temple ശബരിമല (@sabarimalatemple) on

 • विष्णू आणि शिव यांच्या एकत्र शक्तीने भगवान अयप्पा यांची निर्मिती झाली. अयप्पा ही देवता शाश्वत ब्रह्मचारी असल्याने मागील 1500 वर्षांपासून या मंदिरात मासिकपाळीच्या टप्प्यातील महिलेला प्रवेश नाकारला जात होता.
 • पुराणातील कथेनुसार, शबरीमला मंदिर ही ती जागा आहे जेथे अयप्पांनी महिशी या असुराचा वध केला होता. महिशी ही महिशासुराची बहीण होती. दुर्गा देवीने महिशासुराचा वध केल्यानंतर बदला घेण्यासाठी महिशी आणि अयप्पा यांच्यामध्ये युद्ध रंगलं. मात्र यामध्ये महिशीचा वध झाला.
 • शबरीमला मंदिराचं नाव रामायणातील शबरीच्या नावावरून पडलं. शबरीचं वास्तव्य डोंगरांच्या ज्या भागामध्ये होतं तेथेच हे मंदिर असल्याने या मंदिराचं नामकरण 'शबरीमला' असं करण्यात आलं आहे.
 • शबरीमला मंदिर हे 18 पर्वतांमध्ये आहे. या मंदिरात प्रवेश करण्यासाठीदेखील केवळ 18 चं पायर्‍या आहेत. पहिल्या पाच पायर्‍या आपल्या पाच ज्ञानेंद्रियांचं प्रतिक आहे. त्यापुढील आठ पायर्‍या अपल्यातील आठ वाईट दोषांचं प्रतिक आहे ज्यामध्ये राग आणि वासना यांचाही समावेश होतो. पुढील दोन आपले जन्मजात गुण आणि शेवटचे दोन ज्ञान आणि अज्ञानाचं प्रतिक आहे.
 • शबरीमला हे हिंदू देवतेचं मंदिर असले तरीही मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी दरम्यानच्या रस्त्यात एक मशिददेखील आहे. वावर (Vavar) या मुस्लिम संताच्या स्मरणार्थ आहे. भाविक मंदिरात जाण्यापूर्वी त्याला प्रदक्षिणा मारतात, जाताना अयप्पा आणि वावर दोघांच्याही नावाचा जयघोष करतात.
 • मंदिरात अयप्पाच दर्शन घेण्यापूर्वी भाविकाला 41 दिवसाचं व्रत करावं लागत. यादरम्यान भाविक केवळ शाकाहारी जेवण घेतात. या काळात केस आणि नखं कापण्याला मज्जाव असतो.
 • भारतातील श्रीमंत मंदिरांपैकी एक मंदिर म्हणजे शबरीमला मंदिर, दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक अयप्पाचं दर्शन घेतात.
 • श्रीनिवास अय्यर यांनी लिहलेल्या हरिवरसनम (Harivarasanam) चं पठण केलं जातं. यामध्ये 108 शब्द आणि 8 कडवी आहेत.
 • अयप्पाच्या मंदिरात केवळ साध्या काळ्या किंवा निळ्या रंगाची वस्त्र परिधान करून यावीत असा नियम आहे. दर्शनाच्या वेळेस मांसाहार, मद्यपान टाळण्याचा, दोन वेळेस आंघोळ करण्याचा दंडक आहे.
 • अयप्पाचं मंदिर केवळ मंडलापूजाच्य काळात दर्शनासाठी खुलं असते. हा काळ साधारण 15 नोव्हेंबर ते 26 डिसेंबर असतो. मकरसंक्रांती दिवशी या मंदिरात विशेष पूजा आणि महत्त्व असते. तसेच मल्याळम महिन्याच्या पहिल्या पाच दिवसात खुले असते.

शबरीमला मंदिरामध्ये अयप्पाचं दर्शन सार्‍या वयोगटातील महिलांना खुलं असावं असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानंतर अनेकदा महिलांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता मात्र स्थानिकांनी याला मोठ्या प्रमाणात विरोध केला. दरम्यान मंदिर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र आता