Sabarimala Temple (Photo Credits : File Photo)

SabarimalaTemple: केरळच्या शबरीमला मंदिरामध्ये (SabarimalaTemple) काही दिवसांपूर्वी दोन 40 वर्षीय महिलांनी प्रवेश करून मागील सुमारे 1500 दिवसांची परंपरा मोडीत काढली. याप्रकारानंतर मंदिर शुद्धिकरणासाठी बंद करून पुन्हा दर्शनासाठी खुले केले. गुरूवारी रात्री उशिरा शशिकला (Sasikala) या  श्रीलंकन महिलेनेदेखील शबरीमला मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्या महिलेला रस्स्त्यातच रोखले. महिलांच्या शबरीमला मंदिरातील प्रवेशामुळे सध्या केरळमध्ये हिंसाचार पेटला आहे.

शबरीमला मंदिरात मंदिरात प्रवेश करणार्‍या या महिलेचे नाव शशिकला (Sasikala) आहे. तिच्यासोबत पती आणि तिची मुलं आहेत. अयप्पाच्या मंदिरात मासिकपाळी सुरू असणार्‍या टप्प्यातील महिलांना प्रवेश नाही. चिमुकल्या किंवा मासिकपाळी बंद झालेल्या महिलांना प्रवेश दिला जातो. शशिकला यांनी केलेल्या दाव्यानुसारत्या मोनोपॉजच्या टप्पात आहेत. त्याबाबतचं मेडिकल सर्टिफिकेटदेखील त्यांच्याकडे आहे. मात्र पोलिसांनी त्यांना वाटेतच रोखलं. केरळच्या Sabarimala Temple बद्दल या '11' इंटरेस्टिंग गोष्टी वाचून तुम्ही थक्क व्हाल!

शबरीमला मंदिरामध्ये 40 वर्षांच्या दोन महिलांनी प्रवेश केल्यानंतर केरळमध्ये सध्या वातावरण तापलं आहे. स्थानिकांच्या विरोधामुळे निर्माण झालेल्या हिंसाचाराप्रकरणी केरळमध्ये एकूण 745 जणांना अटक करण्यात आली. तर 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. शबरीमला कर्म समिती आणि आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेने या बंदची हाक दिली होती.