RTGS च्या वेळेत बदल, 1 जून पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत करू शकणार पैसे ट्रान्सफर
RBI (File Photo)

ऑनलाईन माध्यामातून पैशांची देवाण घेवाण करण्यासाठी RTGS, NEFT अशा सुविधांचा वापर करण्याचा आजकाल अनेक ग्राहकांचा कल असतो. सुरक्षित आणि सहज पैसे ट्रान्सफर करण्याच्या या प्रक्रियेमध्ये आता ग्राहकांसाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने RTGS च्या वेळेमध्ये बदल केले आहे. पूर्वी संध्याकाळी 4.30 असलेली वेळ आता वाढवून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत केली आहे. ही नवी वेळ 1 जूनपासून लागू होणार आहे.

ANI Tweet

RTGS म्हणजेच Real Time Gross Settlement Systems द्वारा किमान 2 लाख रूपये ट्रान्सफर करता येऊ शकतात. 8am ते 11am, 11am ते 1am आणि 1am ते 6pm या तीन टप्प्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले जातात. त्यासाठी ग्राहकांना 2-5 रूपये अधिक शुल्क भरावे लागणार आहेत.