आंध्रप्रदेशामध्ये (Andhra Pradesh) तिरूपती बालाजीच्या दर्शनानंतर (Tirupati Balaji Mandir Darshan) घरी परतणार्या सोलापूरच्या (Solapur) भाविकांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे तर 5 जण गंभीररित्या जखमी झालेले आहेत. तिरूपती जवळ चंद्रगिरी जवळ डिव्हायडरला गाडी आदळली आणि ही दुर्घटना झाल्याचं समोर आलं आहे. ही गाडी तवेरा होती. दर्शन झाल्यानंतर सारे सोलापूरला निघताना काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे.
कारचा वेग जास्त असल्याने गाडी अचानक डिव्हायर्डरला आदळल्याने 4 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या अपघाताची दखल घेतली आहे. त्यांनी जखमींवर योग्य उपचार व्हावेत यासाठी संबंधित यंत्रणांना आदेश दिले असल्याचं सांगितले आहे.
तिरुपती येथील बालाजीच्या दर्शनासाठी गेलेल्या सोलापूर जिल्ह्यातील चार तरुणांच्या अपघाती मृत्यूचे वृत्त दुःखद आहे. देवदर्शन घेऊन परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली. मृतांच्या परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे. दिवंगतांच्या आत्म्यास सद्गती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली!
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 25, 2023
अर्थव टेंभुर्णीकर, मयुर मठपती, ऋषिकेश जंगम व अजय लुट्टे अशी चार मृतांची नावं आहेत. जुळे सोलापुरातील जानकी नगर येथील नऊ मित्र तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनाला गेले होते. या अपघाताप्रकरणी चंद्रगिरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.