Reliance Industries उचलणार त्यांच्या कर्मचारी व कुटुंबियांसाठी कोविड 19 लसीकरणाचा खर्च
नीता अंबानी (Photo Credit: IANS)

भारतामध्ये कोरोना संसर्गाचा धोका रोखण्यासाठी आता सर्वसामान्यांनाना देखील लस देण्यासाठी सुरूवात झाली आहे. यामध्ये रिलायंस फाऊंडेशन कडून रिलायंसच्या कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना लस देण्यासाठी सारा खर्च रिलायंस कडून केला जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. नुकताच त्याबाबतचा एक इमेल नीता अंबानी (Nita Ambani) यांनी रिलायंस (Reliance Industries) च्या कर्मचार्‍यांना पाठवत रिलायंसच्या कर्मचार्‍यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. Covid-19 Vaccination in India: 1 मार्चपासून सुरु होणाऱ्या कोविड-19 लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन कसे कराल? जाणून घ्या.

नीता अंबानी यांनी पाठवलेल्या इमेल मध्ये कोविड 19 लसीकरणामध्ये कर्मचारी त्याचा/ त्याची साथीदार, मुलं आणि पालकांना लस दिली जाईल त्याचा खरच कंपनी उचलणार असल्याचं सांगण्यात आले आहे. आता आपण या कोरोना वायरस जागतिक आरोग्य संकटाच्या शेवटच्या टप्प्यावर आहोत. लसीकरणाला सुरूवात झाली आहे. अजूनही सुरक्षा बाळगणं आवश्यक आहे. आपण एकत्र लढलो तर या आरोग्य संकटाविरूद्ध आपण नक्कीच एकत्र लढू शकतो आणि जिंकू शकतो असे देखील नीता अंबानी यांनी कर्मचार्‍यांना उद्देशून लिहलेल्या पत्रामध्ये नमूद केले आहे.

Reliance Family Day 2020 च्या मेसेजमध्ये नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांनी भारतामध्ये लस उपलब्ध होताच लवकरात लवकर ती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवली जाईल यामध्ये रिलायंसच्या कर्मचार्‍यांनादेखील ती पुरवली जाईल असा शब्द दिला होता. रिलायंस प्रमाणेच Infosys, Accenture आणि Capgemini या आयटी क्षेत्रातील देखील बड्या कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांना लस देण्यासाठी खर्च उचलणार आहेत.