Rekha Gupta's Announcement On Mahila Samriddhi Yojana फोटो सौजन्य - Edited Image

Rekha Gupta's Announcement On Mahila Samriddhi Yojana: दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यापूर्वी, मुख्यमंत्रीपदी निवडून आलेल्या रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांनी गुरुवारी दिल्लीतील महिलांना दिलेलं वचन पाळण्यासंदर्भात मोठी घोषणा केली. भाजप सरकार (BJP Government) दिल्लीतील महिलांना दरमहा 2500 रुपये आर्थिक मदत देण्याचे त्यांचे निवडणूक वचन पूर्ण करेल. मासिक मदतीचा पहिला हप्ता (Mahila Samriddhi Yojana First Installment) 8 मार्चपर्यंत त्यांच्या खात्यात जमा केला जाईल असं आश्वासन, रेखा गुप्ता यांनी दिलं आहे. बुधवारी भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून निवडून आलेल्या गुप्ता यांनी त्यांच्या आश्वासनांची पूर्तता करणे, ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं सांगितलं.

रेखा गुप्ता यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करणे ही राजधानीतील सर्व 48 भाजप आमदारांची जबाबदारी आहे. आम्ही महिलांसाठी आर्थिक मदतीसह आमची सर्व आश्वासने निश्चितपणे पूर्ण करू. 8 मार्चपर्यंत महिलांना त्यांच्या खात्यात 100 टक्के आर्थिक मदत मिळेल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. (हेही वाचा - Rekha Gupta Delhi CM Oath: रेखा गुप्ता बनल्या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री; रामलीला मैदानावर पार पडला शपथविधी सोहळा, 6 मंत्र्यांनीही घेतली शपथ)

दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या (DUSU) माजी अध्यक्षा आणि नगरपालिका नगरसेवक असलेल्या रेखा गुप्ता यांनी आज रामलीला मैदानावर पंतप्रधान मोदी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. रेखा गुप्ता यांच्यासोबत परवेश वर्मा, आशिष सूद, मनजिंदर सिंग सिरसा, कपिल मिश्रा, रवींद्र इंद्रराज सिंग, कपिल मिश्रा आणि पंकज सिंग यांना उपराज्यपाल व्ही के सक्सेना यांनी पदाची शपथ दिली.