दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज रामलीला मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अशाप्रकारे भारतीय जनता पक्षाने 27 वर्षांनंतर दिल्लीच्या सत्तेवर पुनरागमन केले आहे. 50 वर्षीय रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. शपथविधीपूर्वी, रेखा गुप्ता यांनी मरघट वाले हनुमान मंदिरात दर्शन घेतले. रेखा गुप्ता यांच्यासोबत 6 मंत्र्यांनीही शपथ घेतली. यामध्ये प्रवेश वर्मा, आशिष सूद, मनजिंदर सिंग सिरसा, रवींद्र इंद्रराज सिंग, कपिल मिश्रा आणि पंकज कुमार सिंग यांचा समावेश आहे. भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील या कार्यक्रमात उपस्थित होते.

शपथ घेण्यापूर्वी रेखा गुप्ता यांनी गुरुवारी सकाळी माध्यमांना सांगितले की, 'ही एक मोठी जबाबदारी आहे. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी पंतप्रधान मोदी आणि पक्षाच्या हायकमांडचे आभार मानते'. यासोबतच त्यांनी आपण शीश महलमध्ये राहणार नसल्याचेही सांगितले. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानाचे नाव भाजपने शीशमहाल ठेवले. अरविंद केजरीवाल यांनी ते बांधले होते. केजरीवाल यांनी नियमांचे उल्लंघन करून ते बांधण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा भाजपचा आरोप आहे. भाजपने तो निवडणुकीचा मुद्दाही बनवला होता. (हेही वाचा: Delhi New CM Rekha Gupta: जाणून घ्या कोण आहेत दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्ता; उद्या रामलीला मैदानावर पार पडणार शपथविधी समारंभ)

Rekha Gupta Delhi CM Oath:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)