Shaktikanta Das (PC - PTI)

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी आज नागरिकांना आवाहन करताना 2 हजार च्या नोटा बदलण्यासाठी बॅंकेमध्ये गर्दी न करण्याचं आवाहन केले आहे. सध्या या नोटा चलनातून मागे घेण्यात आल्या असल्या तरीही वैध चलन आहे. अजून 4 महिन्यांचा कालावधी आहे. 30 सप्टेंबर पर्यंत नागरिक 2000 ची नोट बदलून घेऊ शकतात. त्यासाठी मुबलक पर्यायी नोटा देखील छापून तयार असल्याचा दावा दास यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी 2000 च्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय झाला असला तरीही या नोटा अनेक दुकानदार घेण्यास नकार देत आहेत. दरम्यान दास यांनी दुकानदारांनाही आवाहन केले आहे की नोटा स्वीकारणं टाळू नका. वेळच्या वेळी अशाप्रकारे नोटा चलनातून बाहेर काढल्या जातात पण चलन वैध असल्याने कोणाची गैरसोय होणार नसल्याची काळजी घेत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे. 4-5 वर्षांपूर्वी छापण्यात आलेल्या या 2000 च्या नोटांचा उद्देश आता सफल झाला असल्याचंही ते म्हणाले आहेत.

भारतात सध्या सर्वत्रच उन्हाचा कडाका वाढला आहे. त्यामुळे बॅंकांनी ग्राहकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी. वेटिंग एरिया, पाण्याची सोय पहावी असं आवाहनदेखील केले आहे. PAN Rules For 2000 Notes: बँक खात्यात 50,000 रुपये किंवा त्याहून अधिक ठेवींसाठी पॅनची आवश्यकता 2,000 रुपयांच्या नोटांवरही लागू .

आरबीआयने एका वेळेस 2000 च्या 10 म्हणजे 20 हजारांच्या रक्कमेच्या नोटा बदलण्यासाठी मुभा दिली आहे. यामध्ये कोणतीही स्लिप भरण्याचे, आयडी दाखवण्याचे बंधन नागरिकांवर नसणार आहे.