राजस्थान: गोपाष्टमीच्या पूर्वसंध्येला चुरू मध्ये 80 गायींचा मृत्यू; कारण अस्पष्ट
cow shelter in Churu | Photo Credits: Twitter/ANI

राजस्थान (Rajasthan) मधील चुरू (Churu) जिल्ह्यातील एका गावामध्ये सुमारे 80 गायींच्या अचानक मृत्यूमुळे खळबळ माजली आहे. संशयितरित्या मृत्यूमुखी पडलेल्या या गायींच्या मृत्यूचं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. या गायींचा मृत्यू विषबाधेमुळे झाला की एखादा आजार किंवा अन्य कारण याचा तपास अद्यापही सुरू आहे अशी माहिती सरदारशहर तहसीलदार कुतेंद्र कंवर (Kutendra Kanwar, Sardarshahar Tehsildar) यांनी दिली आहे.

परिक्षणासाठी चार्‍यांचे नमुने नेण्यात आले आहेत. आज उत्तर भारतामध्ये 'गोपाष्टमी'चा दिवस आहे. गोपाष्टमी ही भगवान कृष्ण आणि गायींसाठी समर्पित केलेला एक सण आहे. स्थानिक रिपोर्ट्सनुसार, अचानक गायींच्या तोंडाला फेस आला होता. त्यानंतर त्या एकामागोमाग एक खाली कोसळायला लागल्या. ही घटना गुरूवार 20 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. त्यानंतर काल (21 नोव्हेंबर) पर्यंत एकापाठोपाठ एक गायींचा मृत्यू झाला आहे. Cow Cabinet: गोधन संरक्षण व संवर्धनासाठी मध्य प्रदेशात शिवराजसिंग चौहान सरकारची 'गो कॅबिनेट'ची घोषणा; गोपाष्टमीच्या मुहूर्तावर पहिली बैठक.

ANI Tweet

गौशाळेमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांची चौकशी करण्यात आली आहे. त्यांच्या माहितीनुसार त्यांनी नेहमी दिला जाणाराच चारा आणि खाद्य दिले आहे. दरम्यान गायींची परिस्थिती बिघडताच मेडिकल टीम तात्काळ तेथे हजर झाली. त्यांनी गायींवर इलाज केला मात्र डॉक्टर्स त्या गायींना वाचवू शकलेले नाहीत.