रेल्वेच्या प्रवासी भाड्यात वाढ होण्याची शक्यता; जाणून घ्या या दरवाढीची कारणे
Railway | Image used for representational purpose | (फोटो सौजन्य-फेसबुक)

रेल्वे प्रवाशांसाठी धक्कादायक बातमी! लवकरच रेल्वेच्या प्रवासी भाड्यात वाढ होणार असून पंतप्रधान कार्यालयाने (PRO) रेल्वे मंत्रालयाला परवानगी दिली आहे. ही बातमी कळताच रेल्वे प्रवाशांना धक्काच बसला. अशी तडकाफडकी भाडेवाढीचा निर्णय का घेण्यात आला असेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आर्थिक मंदीचा परिणाम म्हणून रेल्वे मंत्रालय पैशांच्या टंचाईला तोंड देत असल्यामुळे पीएमओ ने परवानगी दिल्यानंतर याच महिन्यात मंत्रालय भाडेवाढीचे धोरण तयार करणार आहे.

या भाडेवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसणार असून अचानक ही भाडेवाढ का करण्यात आली आहे असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

हेदेखील वाचा- रेल्वे तिकीट आरक्षणासाठी नियमात बदल, जाणून घ्या कोणत्या गोष्टीसाठी किती रुपये स्विकारणार

जाणून घ्या भाडेवाढीचे कारण:

सध्या देशात आर्थिक मंदीचा परिणाम म्हणून रेल्वे मंत्रालय पैशांच्या टंचाईला तोंड देत असल्यामुळे पीएमओने परवानगी दिल्यानंतर याच महिन्यात मंत्रालय भाडेवाढीचे धोरण तयार करणार आहे. आर्थिक वाढीचा दर अपेक्षेपेक्षा कमी राहिल्यामुळे रेल्वेला माल वाहतुकीतून कमी महसूल मिळाला आहे. याशिवाय वेगववान आणि स्पर्धातम्क रस्ते वाहतूक उपलब्ध असल्यामुळे रेल्वे आधीच दडपणाखाली आहे.

विशेष म्हणजे प्रवासी मिळवण्याच्या आघाडीवर विचार करता रेल्वेला विमानसेवेचे आव्हान आहे. कारण विमान कंपन्या रेल्वेच्या तुलनेत कमी भाडे आकारतात. त्यामुळे प्रवाशांची संख्या देखील कमी असते.

प्रवासी मिळविण्याच्या आघाडीवर विचार करता रेल्वेला विमानसेवेचे आव्हान आहे कारण विमान कंपन्या रेल्वेच्या तुलनेत कमी भाडे आकारतात. पायाभूत सुविधांची कामे पाहणा-या सचिवांच्या बैठकीत पीएमओने भाडेवाढीला हिरवा कंदिल दाखविला आहे.