Rahul Gandhi on PM Narendra Modi: मिस्टर 56 इंच घाबरले आहेत, देशाच्या सुरक्षेशीही छेडछाड; राहुल गांधी यांचा पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा
Rahul Gandhi on Narendra Mod | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, मोदी सरकाकडे देशाच्या सुरक्षेबाबत कोणतेही धोरण नाही. राष्ट्रीय सुरक्षेसोबत छेडछाड केली जात आहे. सीमेवर आपले जवान जीवाची बाजी लावून उभे आहेत. देशाचे संरक्षण करत आहेत. तर इथे केंद्र सरकार खोटे बोलत आहे. याच मुद्द्यावरुन राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून हल्ला चढवला आहे. मिस्टर 56 इंच (Mr. 56 Inches) घाबरले आहेत, असाटोलाही राहुल गांधी यांनी पंतप्रधानांचा नामोल्लेख टाळत लगावला आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसोबत छेडछाड केली जात आहे. कारण मोदी सरकारकडे कोणतीच स्ट्रॅटीजी नाही. मिस्टर 56 इंच घाबरले आहेत. जे जवान सीमेवर आपल्या जीवाची बाजी लावून उभे आहेत त्यांच्यासोबतच माझ्या संवेदना आहेत. केंद्र सरकार मात्र खोटे बोलत आहे.' (हेही वाचा, Rahul Gandhi Tweet: नोटाबंदीला पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका, केलं 'असं' ट्विट)

ट्विट

दहशतवाद्यांसोबत लढताना नुकतेच काही जवन शहीद झाले. या जनावांना आपले प्राण गमवावे लागले. दहशतवाद या मुद्द्यावर विरोधक सातत्याने केंद्र सरकारवर त्यांच्या कार्यशैलिविरुद्ध प्रश्न उपस्थित करत आले आहेत. तसेच, राहुल गांधी हे सुद्धा दहशतवाद, नोटबंदी, महागाई, भारत-चीन वाद अशा एक ना अनेक मुद्द्यांवर केंद्र सरकारवर नेहमीच निशाणा साधत आले आहेत. राफेलवरुनही राहुल गांधी केंद्र सरकारला नेहमीच घेरत असतात.