पंजाब: घरातल्यांच्या मर्जीच्या विरोधात लग्न केल्याने मुलीच्या नातेवाईकांनी जाळले मुलाचे घर
Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

पंजाब (Punjab) मधील तरनतारन येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका कपल्सला घरातल्यांच्या मनाविरोधात लग्न करणे महागात पडले आहे. कारण मुलीने तिच्या प्रियकरासोबत कोर्टात लग्न केले असता तिच्या घरातल्यांनी चक्क मुलाचेच घर जाळल्या प्रकार समोर आला आहे.(Internet Porn: इंटरनेटवर पॉर्न सर्च केल्यास 1090 क्रमांकावर संदेश; उत्तर प्रदेश पोलिसांकडून कारवाई)

मुलीने असे म्हटले आहे की, तिच्या घरातील मंडळींना हे लग्न मान्य नव्हते. त्यामुळे घरातल्यांच्या मर्जी विरोधात लग्न केले. प्रियकराचे नाव शमशेर सिंह असे आहे. तरनतारन पोलिस स्थानकात जाऊन शमशेर सिंह याने आपल्या प्रेयसीच्या सुरक्षिततेसाठी मागणी केली आहे. तर शमशेर सिंह संदीप कौर नावाच्या मुलीवर गेल्या काही वर्षांपासून प्रेम करत होता. या दोघांनी घरातल्यांना लग्नासाठी तयार करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. परंतु मुलीच्या घरातल्यांनी त्यासाठी नकार दिला.(Uttar Pradesh मधील धक्कादायक घटना; बिछाना खराब केला म्हणून चुलतीने केली 5 वर्षांच्या पुतण्याची हत्या; वडिलांच्या मदतीने मृतदेह पुरला)

अखेर खुप प्रयत्न केल्यानंतर सुद्धा दोघांनी पळून जाऊन लग्न केले. पण ही गोष्ट मुलीच्या घरातल्यांना पटली नाही. तेव्हा त्यांनी मुलाच्या घरी जाऊन चोरी केली आणि राहिलेल्या सामानाला आग लावली. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.