Internet Porn: इंटरनेटवर पॉर्न सर्च केल्यास 1090 क्रमांकावर संदेश; उत्तर प्रदेश पोलिसांकडून कारवाई
Internet | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

महिला आणि तरुणींसोबत होणाऱ्या अत्याराच्या घटना रोखण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिस (Uttar Pradesh Police) मोहीम राबवत आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी आता आणखी एक पाऊस उचलले आहे. जर एखाद्या व्यक्तीने महिला, तरुणांसोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी एक 1090 सेवा सुरु केली आहे. या सेवेद्वारे पोलीस नागरिकांचे मनपरीवर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी इंटरनेटचा आधार घेतला जाणार आहे. इंटरनेटच्या माध्यमातून जर कोणी पॉर्न सर्च (Internet Porn Search ) करत असेल तर उत्तर प्रदेश पोलिसांच्या 1090 सेवेवर थेट संदेश जाणार आहे. युजर्स मोबाईलवर ज्या काही गोष्टी सर्च करत आहे त्यावर पोलिसांची नजर राहणार आहे.

उत्तर प्रदेशमधील एडीजी नीरा रावत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की, इंटरनेट वापरुन घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये घट करण्यसाठी 1090 सेवा सुरु करण्यात आली आहे. ही सेवा अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे उत्तर प्रदेश पोलिसांचे लक्ष्य आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी डिजिटल चक्रव्यूवह (महिला सुरक्षेसाठी 360 डिग्री इकोसिस्टम) साठी एक डिजिटल आउटरीच रोडमॅप तयार केला आहे. (हेही वाच, जास्त पैसे मोजूनही तुमचे इंटरनेट स्लो चालतंय? त्यासाठी आवश्यक आहे 'नेट न्यूट्रॅलिटी')

एडीजी नीरा रावत यांनी सांगितले की पायलट प्रोजेक्टच्या माध्यमातून राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये ही सेवा सुरु करण्यात आली होती. याला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. आता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. राज्यात सुमारे 11.6 कोटी इंटरनेट युजर्स आहेत. हे सर्व लोक 1090 अंतर्गत आहेत. महिलांच्या फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम आयडीवर सुरक्षेसंबंधी मेसेज आणि युवकांना इशाराही दिला जाणार आहे.

या सर्व योजनेचे नाव आपली सुरक्षा असे देण्यात आले आहे. या योजनेंतर्गत राज्याच्या सर्व इंटरनेट युजर्सपर्यंत पोहोचण्याचे आमचे लघ आहे. असेही एडीजी रावत यांनी म्हटले आहे.