Punjab: पटियाला मध्ये कार ड्रायव्हरची पोलीस कर्मचाऱ्याला जोरदार धडक, कॅमेऱ्यात व्हिडिओ कैद (Watch Video)
Punjab (Photo Credits-ANI)

पंजाब मधील पटियाला येथील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका कार चालकाने पोलीस कर्मचाऱ्याला जोरदार धडक दिल्याचा व्हिडिओ सद्धा तुफान व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत एका कारने पोलीस कर्मचाऱ्याला जोरदार धडक मारण्यासह त्याला काही अंतर फरफटत नेल्याचे सुद्धा समोर आले आहे.(Madhya Pradesh: स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या पूर्वतयारीवेळी अपघात, 3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल)

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ही घटना अशावेळी समोर आली आहे जेव्हा स्वातंत्र्य दिनानिमित्त पटियाला पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात होती. याच दरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्याने रस्त्यावरुन जाणाऱ्या कारला चेकिंगसाठी थांबवले. तेव्हाच ड्रायव्हरने कार न थांबवता त्याची स्पीड वाढवली. तेव्हाच पोलीस कर्मचाऱ्याने थांबवण्याचा प्रयत्न केला असता तेव्हा त्याला जोरदार धडक दिली.

Tweet:

ही घटना पाहता लोकांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. तर पोलीस कर्मचाऱ्याला तेथेच ठेवत कार चालक पुढे निघून गेला. जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी कारची नंबर प्लेट ट्रेस केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे. गाडी हरियाणा येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी यासाठी हरियाणा पोलिसांना संपर्क केला आहे.