पुलवामात शहीद झालेल्या जवानाच्या पत्नीवर सासरच्या मंडळींची बळजबरी, पैसे मिळणार म्हणून दिरासोबत लग्न करण्याची गळ
पुलवामा दहशतवादी हल्ला (फोटो सौजन्.-PTI)

पुलवामा (Pulwama) दहशतावादी हल्ल्यात एच गुरु नावाचा जवान शहीद झाला. त्यानंतर आता गुरुच्या विधवा पत्नीला सरकारकडून पैसे मिळणार म्हणून दिरासोबत लग्न करण्याची गळ सारसरच्या मंडळींकडून घातली जात आहे. त्यामुळे विधवा कलावती हिने पोलिसात धाव घेतली असून मदत या प्रकरणी मदतीची मागणी केली आहे.

14 फेब्रुवारी पुलावामात झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारताचे जवान शहीद झाले. याबद्दल सर्वत दुख व्यक्त केले जात असताना कर्नाटक सरकार आणि सैन्याकडून मिळणार असलेल्या पैशांची घोषणा करण्यात आली. याच परिस्थितीत बुधवारी कलावती हिने पोलिसांकडे धाव घेत सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी होणाऱ्या छळाबाबात तक्रार केली. तर पोलिसांनी कलावती हिला असे साररच्या मंडळींना शांत राहण्यास सांगितले असून तिच्या दिराने हे सर्व थांबले नाही तर कडक कारवाई करण्यात येईल असे सांगण्यास सांगितले आहे.(हेही वाचा-Pulwama Terror Attack: पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना CREDAI राहत्या शहरात देणार 2BHK फ्लॅट्स)

शहीद जवानाच्या घरातील वाद हा अत्यंत नाजुक आहे. जर या प्रकरणाने हिंसाचे वळण घेतल्यास तर कडक नियमांनुसार सासरच्या मंडळींवर कारवाई करण्यात येईल. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी बुधवारी कलावती हिला शासकीय नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.