Pulwama Terror Attack: जम्मू काश्मीर येथील पुलवामा भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी 'द कॉनफिड्रेशन ऑफ रियल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया'ने (Confederation of Real Estate Developers Association of India) 2 बीएचके घरं देण्याचे जाहीर केले आहे.
राज्यातील राहत्या शहरांमध्ये ही घरे देण्यात येणार असून आम्ही शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या दुःखात सामील आहोत, असे क्रेडाई चे अध्यक्ष जेक्सी शहा यांनी सांगितले. तसंच या कठीण प्रसंगातून जाण्याची ताकद शहीद जवानांच्या कुटुंबियांना मिळो, अशी प्रार्थनाही त्यांनी यावेळी केली.
देशातील 23 राज्यात आणि 203 शहरात क्रेडाईचे बांधकाम व्यवसायिकांचे गृहनिर्माण प्रकल्प आहेत. (पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या 23 जवानांचे SBI कडून कर्ज माफ)
14 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात CRPF चे 40 जवान शहीद झाले. यात पाकिस्तानच्या जैन-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा हात होता. त्यानंतर पिंगलान येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतावाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सैन्याला यश आले असून हल्ल्याचा सुत्रधार गाजी रशीदचा खात्मा करण्यात आला.