Pulwama Terror Attack: पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या 23 जवानांचे SBI कडून कर्ज माफ
SBI बँक (File Photo)

Pulwama Terror Attack: पुलवामा येथील भ्याड हल्ल्यामुळे 40 भारतीय जवान शहीद झाले आहेत. त्यामधील 23 जवानांचे कर्ज स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) माफ केले असून त्यांच्या कुटुंबियांना विम्याचे पैसे तत्काळ दिले जाणार असल्याची घोषणा बँकेने केली आहे.

14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे 40 जवान शहीद झाले. यामधील 23 जवानांनी एसबीआय बँकेकडून कर्ज घेतले होते. तर कर्जातील उर्वरित रक्कम त्यांच्या कुटुंबाला बँकेकडून लवकरच देण्यात येणार असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. सीआरपीएफचे सर्व जवान हे भारतीय स्टेट बँकेचे ग्राहक असून त्यांचे वेतन या बँकेच्या खात्यात जमा होते. विमा सुरक्षेच्या नियमानुसार संरक्षण दलातील जवानांना 30 लाख रुपयांचे विमा कवच लागू असते.(हेही वाचा-Pulwama Terror Attack: पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी SBI ची नवी सुविधा)

शहीद जवानांच्या कुटुंबियांपर्यंत मदत पोहचावी यासाठी SBI ने पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. या माध्यमातून तुम्ही जी काही रक्कम दान कराल ती शहीदांच्या कुटुंबियांपर्यंत पोहचणार आहे. यासाठी तुम्हाला एसबीआयकडून जारी करण्यात आलेला UPI कोड स्कॅन करावा लागेल. त्यानंतर रक्कम थेट 'Bharat Ke Veer' च्या अकाऊंटमध्ये जमा होतील.