PUBG Addiction (Photo Credits/ Twitter)

तरुणाईमध्ये वाढत पबजी (PUBG) या ऑनलाईन खेळाच वेड पाहता आता त्याचे दुष्परिणाम समोर येण्यास सुरूवात झाली आहे. या खेळाच्या व्यसनापायी आत्महत्या,अपघात यासारखे अनेक प्रकार समोर आल्यानंतर आता पबजी हा ऑनलाईन खेळ केवळ सहा तास खेळण्याचं बंधन युजर्सवर घालण्यात आले आहे अशाप्रकारचे काही मीडिया रिपोर्ट्स समोर आले आहेत. मात्र अद्याप या फीचर बाबतची माहिती देण्यात आलेली नाही. कर्नाटक: विद्यार्थ्याने परीक्षेत उत्तराऐवजी लिहिले, 'PUBG गेम डाऊनलोड करण्याची आणि खेळण्याची पद्धत'

एका युजरने ऑनलाईन माध्यामातून 'मी अठरा वर्षापेक्षा अधिक वयाचा आहे. तरीही मला पबजी खेळताना आपण सहा तासांपेक्षा अधिक वेळ खेळत असल्याचं नोटिफिकेशन आलं आहे'. या आशयाचे स्क्रीनशॉट्स शेअर करण्यात आले आहेत.

PUBG युजर्सचं ट्विट  

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, पबजी वाढत व्यसन तरूणाईला घातक ठरत आहे. यामध्ये आत्महत्या, नैराश्य, परीक्षांमध्ये अपयश यांचे वाढते प्रमाण पाहता भारतामध्ये पबजी खेळण्याच्या वेळेवर मर्यादा येऊ शकते असे सांगितले जात आहे. दिवसभरात सहा तासांपेक्षा अधिक वेळ कुणालाही खेळता येणार नाही. 18 वर्षापेक्षा कमी असलेल्यांना काही विशिष्ट तासांनी नोटिफिकेशन पाठवलं जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. मात्र या नव्या बदलांबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.