Narendra Modi | (Photo Credits: ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज महिलांसोबत भजन, कीर्तन केले आणि करोलबाग येथील श्री गुरु रविदास विश्राम धाम मंदिरात ( Sant Ravidas temple) पूजाही केली. पंतप्रधानांनी प्रथम मंदिरात जाऊन पूजा केली. त्यानंतर मंदिरात बसलेल्या महिलांसोबत भजन, कीर्तन केले. पंतप्रधानांच्या भजन, कीर्तनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये पंतप्रधान उपस्थितांसोबत संवाद साधतानाही दिसत आहेत.

संत रविदास यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त पंतप्रधानांनी श्री गुरु रविदास विश्राम धाम मंदिरस भेट दिली. या वेळी त्यांनी तेथे सुरु असलेल्या भजन, कीर्तनात आपला सहभाग नोंदवला. व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता पंतप्रधान मंदिरामध्ये महिलांसोबत मजीका वाजवत आहे. या दरम्यान ते उपस्थितांशी संवादही साधत आहेत. (हेही वाचा, महाराष्ट्र कोरोनाचा सुपर स्प्रेडर या PM Narendra Modi यांच्या वक्तव्यावर Sanjay Raut यांनी दिली 'ही प्रतिक्रिया!)

ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संत रविदास यांची पूजा करतानाचा एक फोटोही ट्विटरवर पोस्ट केला होता. या फोटोसोबत पंतप्रधानांनी लिहीले होते की, महान संत गुरु रविदासजी यांची जयंती आहे. त्यांनी ज्या प्रकारे आपले जीवन समाजातील जातपात, शिवताशिवत यांसारख्या वाईट प्रथा परंपरा समाप्त करण्यासाठी समर्पीत केले. त्यांचे कार्य आजही प्रेरणादाई आहे. अशा या पवित्र दिवशी मला त्यांच्या कार्यस्थळावरुन काही गोष्टी आठवतात. सन 2016 आणि 2019 मध्ये मला इथे माता टेकविण्याचा आणि लंगर लावण्याची संधी मिळाली. एक खासदार म्हणून मी हे नाते निश्चित केले होते की, या तीर्थस्थळाचा विकास करण्याबाबत काहीही कमी पडू द्यायचे नाही.