महाराष्ट्र कोरोनाचा सुपर स्प्रेडर या PM Narendra Modi यांच्या वक्तव्यावर Sanjay Raut यांनी दिली 'ही प्रतिक्रिया!
महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम सध्या सुरू असल्याचं त्यांनी म्हणत महाराष्ट्र कोरोनाचा सुपर स्प्रेडर ता वक्तव्यावर आक्षेप नोंदवताना महाराष्ट्राने नदी, समुद्रामध्ये बेवारस मृतदेह फेकले नसल्याचं म्हटलं आहे.
पंतप्रधानांनी काही दिवसांपूर्वी संसदेमध्ये केलेल्या भाषणामध्ये महाराष्ट्राला सुपर स्प्रेडर असं म्हटल्याने राज्यात त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र संताप उमटत आहेत. पण दिल्लीत (Delhi) आज शिवसेना राज्यसभा खासदार संजय राऊत यांनीही त्यांच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. मुंबई मध्ये जाऊन सध्या सुरू असलेल्या प्रकरणी सविस्तर बोलणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे दरम्यान आपल्यामागे राक्षस लावले जात असल्याचं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे.
दोन दिवसांपूर्वी सरकार केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा तसेच महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी संपर्क केला जात असल्याचा, धमकी मिळत असल्याचा खळबळजनक आरोप राऊतांनी केला आहे. पण दिल्ली समोर महाराष्ट्र झुकला नाही आणि झुकणारही नाही असं त्यांनी आज पुन्हा म्हटलं आहे. हे देखील नक्की वाचा: Supriya Sule on PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा अपमान करणे दुर्दैवी- सुप्रिया सुळे .
महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम सध्या सुरू असल्याचं त्यांनी म्हणत महाराष्ट्र कोरोनाचा सुपर स्प्रेडर ता वक्तव्यावर आक्षेप नोंदवताना महाराष्ट्राने नदी, समुद्रामध्ये बेवारस मृतदेह फेकले नसल्याचं म्हटलं आहे. किमान संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींनी तरी खोटं बोलू नये असं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी महाराष्ट्रातील भाजपा नेत्यानींही यावर चुप्पी साधणं हेच तुमचं महाराष्ट्र प्रेम आणि महाराष्ट्र बाणा आहे का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Feb 10, 2022 10:18 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

