Prime Minister Narendra Modi (Photo Credits: PIB)

देशातील कोरोनाची परिस्थिती आणि कोविड-19 लसीचे (Covid-19 Vaccine) वितरण याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आढावा घेतला. यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, निती आयोगाचे सदस्य, मुख्य वैद्यकीय सल्लागार, वरिष्ठ संशोधक, पीएमओचे अधिकारी आणि केंद्र सरकारच्या इतर विभागांचे अधिकारी यांच्यात बैठक पार पडली. देशाची लोकसंख्या पाहाता लस तयार झाल्यानंतर लसीचे लवकरात लवकर वितरण होणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे लसीसाठी लागणारी सर्व साधने आणि वितरण हे लवकरात लवकर व्हावे, यादृष्टीने पाऊल उचलण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पीएमओ रिलीजनसुार, देशातील तीन लसी विकासाच्या टप्प्यात आहेत. त्यापैकी 2 लसी दुसऱ्या टप्प्यात तर एक लस तिसऱ्या टप्प्यात आहे.

लस आल्यानंतर त्या लसीसाठी लागणारी कोल्ड स्टोरेज, लसीचे वितरण, लस वितरणाची पाहाणी, लसीसाठी लागणाऱ्या आवश्यक उपकरणांची तयारी या सर्व बाबींकडे आर्वजून लक्ष देणे, गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसंच लस वितरणात देशाने निवणूका आयोजन आणि आपत्ती व्यवस्थापनाचा अनुभव देशाने वापरावा, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. (COVID-19 Vaccine Update: जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन च्या कोविड-19 लसीच्या चाचण्यांना ब्राझीलमध्ये तात्पुरती स्थगिती)

SARSCoV-2 हा व्हायरस स्टेबल असून त्यामागे कोणत्याही प्रकारची म्युटेशन होत नसल्याचे भारतातील आयसीएमआर आणि डिमार्टमेंट ऑफ बायोटेक्नोलॉजी यांनी कोविड-19 वर केलेल्या अभ्यासावरुन समोर आले आहे. दरम्यान, भारतीय संशोधक आणि रिसर्च टिम्स अफणागिस्तान, भुतान, बांग्लादेश, मालदिव्स, नेपाळ आणि श्रीलंका या देशांची संवाद साधून लस अधिक परिणामकारक बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

लसी वितरणासाठी सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेश, जिल्हास्तरीय समिती, नागरि संस्था, स्वयंसेवक, नागरिक आणि तज्ज्ञ यांचा सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. या सर्व प्रक्रीयेसाठी आयटी सिस्टम बनवण्यात यावी. जेणेकरुन लसीचे वितरण सुरळीत करता येईल आणि देशाच्या हेल्थकेअर स्टिटमला ते उपयोगी पडेल. तसंच नागरिकांनी सोशल डिस्टसिंग, मास्क घालणे, नियमित हात धुणे या नियमांचे विशेषत: येणाऱ्या पुढील सणासुदीच्या काळात काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. दरम्यान, लस वितरणासाटी राज्यांशी सल्लामसलत करणारा तज्ञांची टीम सक्रीयपणे काम करत आहे