Gangrape. (Representational image)

Rajasthan: गर्भवती महिलेवर पाच मित्रांनी तब्बल 11 वेळा सामुहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे या महिलेचा गर्भपातही झाला आहे. राजस्थानातल्या बांसवाडा (Banswara) इथे ही घटना घडली असून, त्यानंतर आता पुन्हा एकदा स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, स्त्रियांनी घरातून बाहेर पडायचे की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 13 जुलैच्या रात्री ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या मित्रासोबत 13 जुलैच्या रात्री  ही महिला प्रवास करीत होती. त्यावेळी दारूच्या नशेत असलेल्या आरोपींनी यांच्याशी भांडण सुरु केले. यात या मित्रावर तलवारीचा वारही केला ज्यामध्ये तो बेशुद्ध झाला. हीच संधी साधून आरोपींनी या महिलेचे अपहरण करून, उदयपूरा इथल्या बस स्टँडवरून एका अज्ञात स्थळी नेले आणि बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी आपल्या इतर काही मित्रांनाही बोलावून घेतले व 5 जणांनी तब्बल 11 वेळा सामुहिक बलात्कार केला. शेवटी तिला एका निर्जन स्थळी सोडून ते निघून गेले. (हेही वाचा: तीन पोलिसांकडून 65 वर्षीय पुरुषावर लैंगिक अत्याचार; सलग तीन दिवस चालू होता शारीरिक छळ)

त्यानंतर इतर काही लोकांनी हा महिलेले हॉस्पिटलमध्ये नेले यादरम्यान तिचा गर्भपात झाला. या महिलेच्या मित्राला या घटनेचा धक्का सहन न झाल्याने त्याने गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी सुनील चरपोटा आणि त्याचे तीन मित्र विकास, गब्बू आणि कलजी याला अटक केली आहे. अक्षरशः अन्गावर कात उभा करणारी ही घटना आहे, याबाबत  आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी विविध स्वयंसेवी संघटनांनी केली आहे.