धक्कादायक! तीन पोलिसांकडून 65 वर्षीय पुरुषावर लैंगिक अत्याचार; सलग तीन दिवस चालू होता शारीरिक छळ
संग्रहित संपादित प्रतिमा

स्त्रियांवरील अत्याचाराला वाचा फोडणारी अनेक माध्यमे आज समाजात उपलब्ध आहेत, कडक कायदे आहेत. मात्र पुरुषांवर होणाऱ्या अत्याचाराचे काय? याउपर अशा प्रकारच्या अत्याचारामध्ये पोलीस स्वतः सामील असतील तर? होय पोलीस या नावाला काळिमा फासणारी फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे, हे वाचून पोलिसांच्या या कृत्याची तुम्हालाही लाज वाटेल. पचरंगा चौकी (भोगपूर पोलिस स्टेशन) अंतर्गत लांबड़ी या गावात 65 वयोवृद्ध व्यक्तिवर 3 मद्यधुंद पोलिसांनी सलग तीन दिवस बलात्कार (Sexual Assault) केला आहे. सवेरा टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

चौकी पचरंगा पोलिसात दिलेल्या तक्रारीत, 65 वर्षीय गुरवीर सिंह, रहिवासी बहराम गाव यांनी याबाबत माहिती दिली. ते बहराम गावच्या ढाब्यावर स्वयंपाकाचे काम करीत असत. गुरुवारी रात्री 3 पोलिस (सैनिक रवि कुमार तलवारा, सतपाल आणि एक नवीन कर्मचारी) ढाब्यावर आले आणि जेवण मागू लागले. गुरवीर सिंह एकटेच होते आणि त्यांची घरी जायची तयारी चालू होती. तीनही पोलिस दारूच्या नशेत होते. मात्र गुरवीर सिंह यांनी त्यांची ऑर्डर घेऊन ते जेवण बनवायला गेले. इतक्यात एक पोलिस आत आला आणि त्याने त्यांच्याशी लैंगिक चाळे करायला सुरुवात केली.

गुरवीर सिंह यांनी या गोष्टीला विरोध दर्शविला असता बाहेर बसलेले दोन पोलिस कर्मचारीही आत आले. त्यांनी त्यांचे कपडे फाडले व त्यांच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. परत दुसऱ्या दिवशीही हे पोलीस धाब्यावर पोहचले आणि पुन्हा तेच कृत्य केले. नाईट ड्युटीवर असलेले हे तीन पोलिस कर्मचारी शनिवारी रात्रीदेखील ढाब्यात आले आणि आळीपाळीने बलात्कार केला. अशाप्रक्रे सलग तीन दिवस हे कृत्य चालू होते. (हेही वाचा: वडिलांना झाडाला बांधून मुलीवर सामूहिक बलात्कार, 6 नराधमांचे कृत्य)

त्यानंतर त्यांना चालण्यास त्रास होऊ लागला, याबाबत कुटुंबीयांनी त्यांना खोदून विचारले असता सत्य परिस्थिती बाहेर आली. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार केली, मात्र डॉक्टर या गोष्टीचे मेडिकल सर्टिफिकेट देण्यास तयार नाहीत त्यामुळे गुन्हा नोंदवता येत नाही. डॉक्टर आणि पोलीस यांच्यात संगनमत असल्याचे गुरवीर सिंह यांचे म्हणणे आहे.