Prashant Kishor On Rahul Gandhi: काँग्रेस पक्षाचे नेतृत्व कोणा एका व्यक्तीचा दैवी हक्क नाही; प्रशांत किशोर यांचा राहुल गांधी यांच्यावर निशाणा
Prashant Kishor On Rahul Gandhi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी काँग्रेस (Congress) नेतृत्वावर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करणे हा केवळ कोणा एका व्यक्तीचा दैवी हक्क नाही. खास करुन पाठीमागिल दहा वर्षांच्या काळात जी व्यक्ती आपल्या आयुष्यातील 90% निवडणुका पराभूत झाली आहे. प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रशांत किशोर हे निवडणूक रणनीतिकार राहिले आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत त्यांची ममता बॅनर्जी यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका राहिली आहे. प्रशांत किशोर यांनी ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधी याच्यावर निशाणा साधला आहे.

पाठिमागील काही दिवसांपासून ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल बाहेर आपले लक्ष वळवले आहे. त्या दृष्टीकोनातूनच त्या विधाने करत आहेत. त्यांचे सर्व लक्ष लोकसभा निवडणूक 2024 कडे आहे. भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणणे हे त्यांचे प्रमुख लक्ष आहे. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी नुकताच मुंबई दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे व संजय राऊत यांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांनी केलेले विधान महत्त्वाचे आहे. (हेही वाचा, 'पुढील अनेक दशके BJP भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी असेल'- निवडणूक रणनीतीकार Prashant Kishor यांचे मोठे भाकीत)

ट्विट

प्रशांत किशोर यांनी या आधीही काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले होते की, भाजप आता काही दशकांपर्यंत जाणार नाही आणि समस्या अशी आहे की, राहुल गांधी यांना त्याची कल्पनाच नाही. सोशल मीडियावर एका प्रश्नाच्या उत्तरात प्रशांत किशोर यांनी म्हटले की, भाजप आता केंद्रातील एक महत्त्वाची आणि प्रमुख पार्टी बनली आहे. ती सत्तेत असो किंवा नसो भाजपा निर्णायक भूमिकेत असेल. भाजपची भूमिका भविष्यात अशी असेल जशी भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पुढील 40 वर्षे काँग्रेसची होती. राहुल गांधी यांना वाटते की, बस्स आता फक्त काही दिवसांचा अवकाश आहे. लोक भाजपला पराभूत करतील. पण असे होतना दिसत नाही. जोपर्यंत ते स्वत:ला पुरेसे समजत नाहीत. नरेंद्र मोदी यांची ताकद ओळखत नाहीत तोपर्यंत ते त्यांना पराभूत अथवा काऊंटर करु शकत नाहीत.