Politics in Bihar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हनुमान एटका पडला;   LJP अध्यक्ष चिराग पासवान यांच्याविरोधात पक्षात बंडाळी, 5 खासदारांचे लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना पत्र
Chirag Paswan | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला पुरक भूमिका घेणाऱ्या चिराग पासवान (Chirag Paswan) यांच्या लोक जनशक्ती पार्टी (Lok Janshakti Party) आता फुटीच्या उंभरट्यावर आहे. एलजेपीच्या जवळपास 5 खासदारांनी चिराग पासवान यांच्या विरोधात बंड केले आहे. प्राप्त माहितीनुसार, पशुपति पारस पासवान (चाचा), प्रिंस राज (चचेरे भाई), चंदन सिंह, आणि देवी आणि महबूब अली केसर आदी मंडळींनी बंड पुकारले आहे. बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना पत्रही लिहिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. लोक जनशक्ती पार्टीचे संस्थापक आणि माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (Ram Vilas Paswan) यांच्या निधानंतर अवघ्याक काही महिन्यांतच पक्षात बंडाळी निर्माण झाली आहे

प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, लोकजनशक्ती पक्षाच्या खासदारांनीलोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना पत्र लिहून म्हटले आहे की, त्यांना एलजीपी शिवाय इतर पक्षाची मान्यता द्यावी. लोकसभा अध्यक्ष कायदेशीर सल्ला घेऊन पुढील कारवाई करतील. सांगितले जात आहे की, हे पाचही खासदार जनता दल युनायटेडच्या संपर्कात आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान, हे खासदार पक्षनेतृत्वावर नाराज होते. तसेच, खासदार चिराग पासवान यांच्या कामकाजाबद्दलही त्यांना अनेक तक्रारी होत्या. (हेही वाचा, Chirag Paswan: चिराग पासवान यांनी काय कमावले? स्वत:ची नाव तर बुडवलीच, नीतीश कुमार यांच्याही जहाजाला तडे घालवले, भाजप हनुमानाला गिफ्ट देणार का?)

विधानसभा निवडणुकीत एलजेपीला एकही जागा मिळाली नाही. अपवादाने एक जागा मिळाली होती. परंतू, अल्पावदीतच हा आमदार पुढे जनता दल युनायटेडमध्ये सहभागी झाला. राज कुमार सिंह असे या आमदाराचे नाव होते. बिहार विधानपरिषदेत लोजपाला एकही आमदार नाही. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. या वेळी चिराग पासवान यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. दरम्यान, एनडीएच्या बैठकीत जनता दल युनायटेडने चिराग यांच्या नावाला तीव्र विरोध केला होता. त्यानंतर चिराग यांचे नाव चर्चेतून मागे घेण्यात आले. (हेही वाचा, Ram Vilas Paswan & Politics of Bihar: रामविलास पासवान- मताधिक्याने निवडणूक जिंकलेला विश्वविक्रमी चेहरा, NDA आणि बिहारच्या राजकारणाला झटका)

विधानसभा निवडणुकीत चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली होती. त्यामुळे जेडीयुची अशी भावान आहे की, चिराग यांच्या भूमिकेमुळे जेडीयुला प्रचंड नुकसान झाले. एलजेपीचे सर्वच्या सर्व पाचही खादसार जेडीयुत सहभागी झाल्यास या पक्षाची केंद्रातील ताकद वाढणार आहे.