Photo Credits: | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यातील भिंड (Bhind) येथे एक बलात्कार (Rape) आणि हत्येची केस चक्क कंडोमच्या (Condom) मदतीने सॉल्व्ह करण्यात भिंड पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात कोणताही सुगावा मिळत नव्हता, मात्र अखेर एका कंडोमने पोलिसांना खून आणि बलात्काराच्या आरोपींपर्यंत पोहोचण्यास मदत केली. या प्रकरणात पोलिसांनी तिन्ही आरोपींना तुरुंगात टाकले आहे. अटक केलेल्या आरोपींनी प्रथम महिलेवर बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या करून मृतदेह एका पोत्यात टाकून केमोखरी गावाजवळ फेकून दिला.

पंजाब केसरी मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, 17 जून रोजी भिंड केमोखरी गावाजवळ रस्त्याच्या कडेला एका अज्ञात महिलेचा मृतदेह एका पोत्यात सापडला होता. पोत्यामधून दुर्गंध येत होता व त्यावरून स्पष्ट होते की मृत्यू काही दिवसांपूर्वी झाला होता. त्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास सुरू केला. तपासानंतर अज्ञात लोकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. आरोपींनी पुरावे लपवण्यासाठी महिलेचा मृतदेह गावाबाहेर फेकून दिला होता.

मृत महिलेचे वय 40 वर्षांच्या आसपास असल्याचे सांगितले जात होते मात्र तिची ओळख पटली नव्हती. पोलिसांनी खूप प्रयत्न केले मात्र हाती कसलेच धागे लागत नव्हते. घटनास्थळाची तपासणी केल्यावर पोलिसांना तिथून एक कंडोम सापडला जो गुन्हेगारांना पकडण्यात सर्वात मोठा पुरावा ठरला. पोलिसांनी प्रथम कंडोमच्या बॅच क्रमांकाची माहिती घेतली, दुसरीकडे पत्रक छापून मृत महिलेची ओळख जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पत्रकात तिच्या शरीराचे स्वरूप, कपडे आणि स्थितीची माहिती देण्यात आली होती.

कंडोमच्या बॅचवरून पोलिसांना समजले की मिहोनाच्या शासकीय रुग्णालयाने कुटुंब नियोजनासाठी असे कंडोम वितरित केले आहेत. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन या प्रकरणाची चौकशी केली आणि येथून त्यांना बरेच पुरावे मिळाले. यासह महिलेची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. मृताच्या कुटुंबीयांनी महिलेच्या पतीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. यासोबतच त्यांनी श्याम नावाच्या तरुणाचा हत्येत सहभाग असल्याचा संशयही व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी श्यामला ताब्यात घेतले आणि चौकशीदरम्यान त्याने संपूर्ण गोष्ट पोलिसांना सांगितली.

श्याम व्यतिरिक्त, पोलिसांनी इम प्रकरणात अंकित आणि विकी नावाच्या आरोपींना अटक केली आहे आणि हत्येत वापरलेली दुचाकीही जप्त केली आहे.