LPG Gas Subsidy: गॅस सिलेंडरवरील सबसिडी वाढवण्याचा क्रेद सरकारचा प्रयत्न
LPG Cylinder | (Photo Credits: Latestly)

आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सरकार सामान्य जनतेला अनेक गुड न्यूज देण्याच्या तयारीत आहेत. पंतप्रधान उज्ज्वला योजना (Ujjwala Yojana) अंतर्गत केंद्र सरकार लाभार्थ्यांना आणखी दिलासा देण्याच्या तयारीत आहे. येत्या काही दिवसांत तुम्हाला आता एलपीजी गॅस सिलेंडरवर (LPG Gas Cylinder Subsidy) आणखी सूट मिळू शकते. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार उज्वला योजनेच्या (Ujjwala Yojana) लाभार्थ्यांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे. सध्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षभरात 12 एलपीजी गॅस सिलेंडरवर 300 रुपये सबसिडी मिळते. येत्या काही महिन्यांत उज्ज्वला योजनेंतर्गत अतिरिक्त सवलती देण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. (हेही वाचा - 'Abundance in Millets': पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग असलेल्या गाण्याला मिळालं 2024 Grammy Awards साठी नामांकन)

केंद्रीय मंत्रिमंडळाने 4 ऑक्टोबर रोजी 9.5 कोटी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 100 रुपये अनुदान मंजूर केले होते. याआधी सप्टेंबरमध्ये सरकारने देशभरातील सर्व सामान्य ग्राहकांसाठी एलपीजी गॅस सिलेंडरवर 200 रुपये सबसिडी मंजूर केली होती. सध्या उज्ज्वला योजनेचे लाभार्थी एका एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 603 रुपये मोजतात, तर इतर ग्राहकांना एका एलपीजी गॅस सिलेंडर 903 रुपये द्यावे लागतात.

केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आणि सामान्यांसाठी 29 ऑगस्ट 2023 रोजी LPG सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त केले होते. केंद्र सरकारच्या या दिलासादायक निर्णयानंतर सप्टेंबर महिन्यात दररोज रिफिल होणाऱ्या एलपीजी सिलेंडरची सरासरी संख्या 11 लाखांच्या पुढे गेली आहे.