'Abundance in Millets': पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग असलेल्या गाण्याला मिळालं 2024 Grammy Awards साठी नामांकन
'Abundance in Millets' song | Twitter

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांचा सहभाग असलेल्या 'Abundance in Millets' गाण्याला 2024 Grammy Awards साठी नामांकन मिळालं आहे. best global music performance category मध्ये त्यांना हे नामांकन मिळालं आहे. पंतप्रधान मोदी आणि Indian-American singer Falguni Shah, त्यांचा पती Gaurav Shah यांनी हे स्पेशल गाणं बनवलं आहे. या गाण्यामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाचा काही भाग आहे.

जागतिक स्तरावरील उपासमारीचा प्रश्न अधोरेखित करण्यासाठी तसेच या समस्येवर सूपरग्रेन्सच्या माध्यमातून मदत केली जाऊ शकते त्यामुळे त्याबाबत सजगता निर्माण करण्यासाठी 'Abundance in Millets'हे गाण6 बनवण्यात आलं आहे. singer Falu यांनी याबाबत X वर पोस्ट करत माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्राने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केलं आहे.

Abundance in Millets गाणं पहा इथे

जून 2023 मध्ये मोदी अमेरिकेच्या 4 दिवसीय दौर्‍यावर असताना त्यांनी "Abundance in Millets" या गाण्याचं कव्हर प्रदर्शित केलं होतं.

पंतप्रधान मोदी यांनी शहा यांचे 'Abundance in Millets' या गाण्याबद्दलही कौतुक केले, जे निरोगी आणि पर्यावरणास अनुकूल बाजरीबद्दल जागरूकता वाढवते. तिच्या संगीताद्वारे भारत आणि अमेरिकेतील लोकांना एकत्र आणल्याबद्दल पंतप्रधान मोदींनीही तिचे कौतुक केले होते.

Falguni यांना Best Children's Music Album चा ग्रॅमी अवॉर्ड 'A Colourful World' गाण्यासाठी एप्रिल 2022 मध्ये प्रदान करण्यात आला आहे. तिच्या या पहिल्या ग्रॅमी अवॉर्ड साठी पंतप्रधानांनी तिचं कौतुकही केले होते.