कोरोना व्हायरस (Coronavirus) चा सामना करण्यासाठी सध्या चालू असलेल्या देशव्यापी लॉकडाऊन (Lockdown) मुळे, निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी लोकसभा आणि राज्यसभेतील विरोधी पक्षांसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली. या सर्वपक्षीय बैठकीत लॉकडाऊन वाढण्याची चिन्हे दर्शविली आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार पीएम मोदी हे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करणार आहेत व त्यानंतर निर्णय घेतला जाईल. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या सर्वपक्षीय बैठकीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की कोरोना विषाणूच्या वाढत्या घटना लक्षात घेता 14 एप्रिलला लॉक संपेल हे शक्य नाही.
पंतप्रधान मोदी असेही म्हणाले की, कोरोना विषाणूच्या आधीचे आणि नंतरचे आयुष्य हे एकसारखेच राहणार नाही. कोरोना व्हायरस संपल्यानंतरही बरेच व्यावहारिक, सामाजिक आणि वैयक्तिक बदल घडतील. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत लोकसभेतील कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, राष्ट्रवादीचे शरद पवार, शिवसेनेचे संजय राऊत यांच्याशिवाय तृणमूल कॉंग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय, बसपाचे सतीश चंद्र मिश्रा, द्रमुक केटीआर बाळू, बीजदचे पिनाकी मिश्रा, वायएसआरचे मिथुन रेड्डी, सपाचे रामगोपाल यादव, जेडीयूचे राजीव रंजन सिंह, एलजेपीचे चिराग पासवान, अकाली दलचे सुखबीर सिंह बादल अशा नेत्यांचा समावेश होता. (हेही वाचा: Coronavirus: IRCTC कडून 30 एप्रिलपर्यंत सर्व ट्रेन सेवा रद्द, बुकिंग केलेल्या तिकिटांची संपूर्ण रक्कम मिळणार परत)
१ कोरोना रुग्णाचा ३० दिवसात ४०६ लोकांना संसर्ग होऊ शकतो - आरोग्य सचिव लव अगरवाल : Watch Video
24 मार्चपासून 21 दिवसांच्या लॉकडाऊनदरम्यान विरोधी पक्षांशी पंतप्रधानांचा हा पहिला संवाद होता. पंतप्रधानांनी या विषयावर 2 एप्रिल रोजी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशीही संवाद साधला होता. विविध राज्यांमधील वाढती कोरोनाची संख्या पाहता अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवावे असे सांगितले आहे, आता यावर लवकरच ठोस निर्णय घेतला जाईल. मात्र त्य आधी पंतप्रधानांनीची लॉकडाऊन वाढवले जाण्याची शक्यता असल्याचे संकेत दिले आहेत.