पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर फोलोअर्सचा आकडा 6 कोटींचा पार, सर्वाधिक फॉलो केले जाणारे तिसरे World Leader बनले
PM Narendra Modi (Photo Credits: ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या ट्विटरवरील (Twitter) फोलोअर्सचा आकडा आता 6 कोटींचा पार गेल्याची माहिती रविवारी समोक आली आहे. त्याचसोबत नरेंद्र मोदी आता जगातील सर्वाधिक फॉलो करण्यात येणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहेत. ट्विटरवर त्यांनी फक्त अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ही पुढे आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी हे जगातील सर्वाधिक फोलोअर्स असणारे तिसरे वर्ल्ड लीडर बनले आहेत.(PM Modi's Motivational Words For CBSE Students: 'कधीच आशा सोडू नका' सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रेरणादायी संदेश) 

नरेंद्र मोदी यांनी 2009 मध्ये मायक्रो-ब्लॉगिंग साईट्सवर आले होते. तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळत होते. त्यानंतर मोदी यांची लोकप्रियता 2014 नंतर पंतप्रधान झाल्यानंतर अधिक वाढली. विरोधकांकडून वारंवार टीका करुन सुद्धा मोदी यांनी एका वर्षापेक्षा कमी कालावधीत त्यांचे 1 कोटी फोलोअर्स वाढवले. त्यानंतर आता त्यांच्या फोलोअर्सचा आकडा 6 कोटींवर पोहचला आहे. गेल्या वर्षात सप्टेंबर महिन्यात मोदी यांच्या फोलोअर्सचा आकडा 5 कोटींवर पोहचला होता.

ट्विटरचा उपयोग फक्त जगातील अन्य नेत्यांना संबोधित आणि संवाद साधण्यासाठी केला जात नाही तर राष्ट्राला संबोधण्यासह विवध योजनांबाबत सुद्धा माहिती दिली जाते. नुकतेच मोदी यांनी आर्थिक पॅकेज आत्मनिर्भर भारत सारखी आर्थिक निर्णयांबाबत घोषणा केली होती. तसेच मोदी यांचे बहुतांश संबोधनांचे लाईव्ह सुद्धा ट्विटरवर दाखवले जाते. ऐवढेच नाही तर काहीजणांनी त्यांना टॅग केल्यानंतर ते त्यावर आपली प्रतिक्रिया सुद्धा देतात.(World Youth Skills Day: कौशल्य वाढविणे वेळेनुसार त्यात बदल करणे काळाची गरज- पंतप्रधान नरेंद्र मोदी)

अन्य भारतीय नेत्यांसारखेच मोदी सुद्धा देशातील जनतेशी संवाद साधण्यसाठी ट्विटरच्या माध्यमाचा वापर करतात. तर काही दिवसांपूर्वी मोदी यांनी कोरोना व्हायरसच्या महासंकट काळात मास्कचे महत्व पटवून देण्यासाठी एका संदेशाच्या माध्यमातून त्यांच्या चेहऱ्यावर टॉवेल लपेटलेला असल्याचा फोटो प्रोफाइल म्हणून ठेवला होता. तर 2019 मध्ये सार्वत्रिक निवडणूकीपूर्वी काँग्रेसने राफेल करारावरुन भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप लावला होता तो सुद्धा खोडून लावला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने सुद्धा तो फेटाळून लावला होता. त्यावेळी मोदी यांनी नावापुढे चौकीदार असे सुद्धा लिहिले होते.

मोदी युट्युब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या अन्य प्लॅटफॉर्म्सवर सुद्धा अॅक्टिव्ह असतात. इन्स्टाग्रामवर त्यांचे 4.53 कोटी फोलोअर्स असून फेसबुकवक 4.5 कोटी आणि युट्युबवर त्यांचे 69.2 कोटी फॉलोअर्स आहेत.