पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज वाराणसी (Varanasi) मधून लोकसभा निवडणूकीसाठी अर्ज भरला आहे. उमेदवारी अर्जामध्ये दिलेल्या माहितीनुसार नरेंद्र मोदी यांच्याकडे एकूण 3.02 कोटी रूपयांची संपत्ती आहे. 2014, 2019 च्या तुलनेत मोदींच्या संपत्तीमध्ये वाढ झाली आहे. 2019मध्ये त्यांनी जाहीर केलेली संपत्ती 2.51 कोटी होती तर 2014 मध्ये त्यांची संपत्ती 1.66 कोटी होती. यामध्ये गुंतवणूकींसोबतच स्थावर आणि जंगम मालमत्तेचा समावेश आहे.
पीएम मोदींच्या गुंतवणुकीत 2.67 लाख रुपयांच्या सोन्याचा समावेश आहे. त्यामध्ये सोन्याच्या चार अंगठ्याचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, त्यांनी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांमध्ये 9.12 लाख रुपये गुंतवले आहेत. NSC मधील ही गुंतवणूक 2019 मध्ये 7.61 लाखांवरून जवळपास 2 लाखांनी वाढली आहे.
2024 च्या प्रतिज्ञापत्रानुसार पंतप्रधानांकडे 2.85 कोटी रूपयांच्या बॅंकेत FDs आहेत.
पंतप्रधान मोदींकडे कोणतीही जमीन किंवा शेअर्स नाहीत किंवा त्यांची म्युच्युअल फंडात गुंतवणूक नाही. त्यांच्याकडे 52920 रूपये कॅशच्या स्वरूपामध्ये आहेत. "ज्या दिवशी मी हिंदू-मुस्लीम करेन, त्या दिवशी मी सार्वजनिक जीवनातून संन्यास घेईन" 'जास्त मुलांच्या' वक्तव्यावर PM मोदींचे स्पष्टीकरण .
पंतप्रधानांनी जशोदाबेन यांचे नाव पत्नी म्हणून प्रतिज्ञापत्रात सांगितले आहे. मोदींनी गुजरात विद्यापीठातून M.A.ची पदवी घेतल्याचे जाहीर केले आहे. तसेच ते दिल्ली विद्यापीठातून कला शाखेचे पदवीधर आहेत असे नमूद केले आहे. त्यांनी 1967 मध्ये गुजरात बोर्डातून एसएससी परीक्षा उत्तीर्ण केली, असेही सांगितले आहे.
मोदींनी "सरकारकडून मिळणारा पगार" आणि "बँकेकडून मिळणारे व्याज" हे त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत म्हणून सांगितले आहे तर त्यांच्या पत्नीचे उत्पन्नाचे स्रोत "not known"असे नमूद केले आहे. मोदींनी जाहीर केले आहे की, त्यांच्याविरुद्ध कोणताही फौजदारी खटला प्रलंबित नाही किंवा त्यांच्यावर कोणतीही सरकारी थकबाकी नाही.