PM Modi In Maharashtra | Twitter

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घुसखोर आणि जास्त मुलांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन मोठे राजकीय आरोप प्रत्यारोप झाले होते. या वक्तव्यानंतर भाजप हे मुस्लिम विरोधी असल्याचे अनेक विरोधकांनी म्हटले. आता निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यानंतर भाजपला मुस्लिम मत आपल्या विरोधी जाऊ या नये यासाठी नरेंद्र मोदी यांनी आपल्या विधानावर सारवासारवाची उत्तर देत त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. (हेही वाचा -  Ayodhya Ram Mandir: 'मी दलित असल्याने अपमानाच्या भीतीने राममंदिराच्या उद्घाटनाला गेलो नाही'; Mallikarjun Kharge यांनी सांगितले निमंत्रण असूनही अयोध्येला न जाण्याचे कारण)

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यावर स्पष्टपणे बोलले आहेत. ज्या दिवशी मी हिंदू-मुस्लीम करेन, त्या दिवशी मी सार्वजनिक जीवनातून संन्यास घेईन, असं ते म्हणालेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'विरोधक याचा असा अर्थ काढत आहेत हे ऐकून मला धक्का बसला. तुम्हाला कोण सांगितलं मुस्लिमांनाच फक्त जास्त मुलं असतात? मुस्लिमांसोबत हा अन्याय का? गरीब कुटुंबामध्ये देखील जास्त मुलं असतात.' असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

पाहा व्हिडिओ -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत म्हटले होते की, काँग्रेस सत्तेत आल्यास देशाची संपत्ती “घुसखोर” आणि “ज्यांना जास्त मुले आहेत” यांच्यात वाटली जाऊ शकते.

राजस्थानच्या बांसवाडा येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना ते म्हणाले, “पहले जब उनकी सरकार थी, उन कहा था की देश की संपत्ती पर पहला अधिकार मुसलमानों का है. इस्का मतलब, ये संपती इकठ्ठी करके किसको बातेंगे? जिंके झ्यादा बच्चे हैं, उनको बातेंगे, घुसपैठियों को बातेंगे. क्या आपकी मेहनत की कमाई का पैसा घुसपैठियों को दिया जायेगा? आपको मंजूर है? (पूर्वी, जेव्हा ते (काँग्रेस) सत्तेत होते तेव्हा त्यांनी म्हटले होते की देशाच्या संपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे. याचा अर्थ ते ही संपत्ती ज्यांना जास्त मुले आहेत त्यांना घुसखोरांना वाटून देतील. तुमच्या कष्टाने कमावलेले असावेत. घुसखोरांना पैसे दिले जावेत?)