PM Modi at the Bloomberg Business Summit in New York (Photo Credits: Twitter/ ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी अमेरिकेत अमेरिकेतील ब्लूमबर्ग ग्लोबल बिझनेस फोरम (Bloomberg Global Business Forum) मध्ये उद्योगपती आणि उद्योग समूहांच्या प्रतिनिधींसमोर बोलताना भारताच्या प्रगती आणि आर्थिक विकासाचा मार्ग सांगितला. पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या विकासाचे चार मुद्दे प्रभावीपणे मांडले. भारताच्या विकासाचे 'फोर डी' फॅक्टर म्हणून या मुद्द्यांची जोरदार चर्चा सुरु आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, डेमोक्रसी, डेमोग्रफी, डिमांड आणि डिसाइसिवनेस म्हणजेच लोकशाही (Democracy), लोकसंख्याशास्त्र (Demography), मागणी (Demand) आणि and विघटन (Dissociation Ness) या चार प्रमुख मुद्द्यांवर आम्ही पुढे निघालो आहोत. लोकशाही, लोकांच्या अपेक्षा, मागणी आणि सरकारच्या निर्णायक क्षमता या चार मुद्द्यांचा भारताने प्रामुख्याने विचार केल्यामुळेच तो प्रगतीच्या दिशेने पुढे चालला असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी या वेळी सांगितले.

अमेरिकेतील ब्लूमबर्ग ग्लोबल बिझनेस फोरममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. या वेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, भारताचे विद्यमान सरकार हे वेल्थ क्रिएशन आणि बिझनेस कम्युनिटीचा सन्मान करते. आम्ही कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व बिझनेस लिडर्स या निर्णयाला ऐतिहासिक म्हणून संबोधत आहेत. देशातील गुंतवणूक वाढविण्यासाठीही भारत सरकारने निर्णय घेतला आहे. मोदी म्हणाले की, सरकारने सत्तेवर येताच 50 पेक्षाही अधिक कायदे समाप्त केले आहेत. जे कालबाह्य झाले होते. तसेच, विद्यमान व्यवस्थेतील अडथळा ठरत होते. नवे सरकार सत्तेत येऊन आता केवळ तीन ते चार महिनेच झाले आहेत, ही सरुवात आहे. आजून प्रदीर्घ काळ काम करायचे आहे. भारतासोबत भागीदारी करण्यासाठी जगाला संधी आहे, असेही मोदींना यावेळी सांगितले.

जगभरातील गुंतवणुकदारांना भारतात गुंतवणुकीसाठी निमंत्रण देताना मोदींनी सागितले की, आमच्या भारतातील मध्यमवर्ग हा आकांक्षी आहे. जागतिक दृष्टीकोन ठेवणारा आहे. त्यामुळे आपण नव्या ट्रेंडनुसार गुंतवणूक करु इच्छित असाल तर आपले भारतात स्वागत आहे. आमचा युवावर्ग हा अॅप इकॉनमीचा मोठा यूजर आहे. जर आपण स्टार्टअप्समध्ये मोठ्या मार्गेटमध्ये गुंतवणूक करु इच्छित असाल तर, आपण नक्की भारतात या. यासोबत त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर, शहर विकास आणि मेक इन इंडया आदी मुद्द्यांवरही गुंतवणुकदारांना निमंत्रित केले.

पंतप्रधान मोदींनी पुढे म्हटले, भारतात इन्फ्रास्ट्रक्चर विकासासाठी आमचे सरकार गुंतवणूक करत आहे. मात्र, तो अद्याप आवश्यक तितका झाला नाही. येणाऱ्या काही वर्षांमध्ये 100 लाख कोटी रुपये आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करण्याचा आमचा मानस आहे. भारताने 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 2014 मध्ये हे स्वप्न 2 ट्रिलियन डॉलर इतके होते. गेल्या पाच महिन्यांमध्ये आम्ही 1 ट्रिलियन इतके लक्ष्य जवळपास पूर्ण केले आहे. आता आम्ही 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था उभारण्यासाठी प्रयत्नशील आहोत. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आमच्याकडे क्षमता, इच्छाशक्ती आणि प्रयत्न करण्याची तयारी असल्याचे मोदींनी या वेळी सांगितले. (हेही वाचा, Global Goalkeeper Award: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'स्वच्छ भारत अभियान' करिता बिल अँड मिलिंडा गेट्स फाउंडेशनकडून गौरव)

एएनआय ट्विट

ब्लूमबर्ग बिझनेस समिटमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, देशांतर्गत (भारत) करांचे जाळे बाजूला सारत आम्ही वस्तू सेवा कर (GST) लागू केला आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये भारतात 286 अब्ज इतकी विदेशी गुंतवणूक (FDI) आली आहे. ही आकडेवारी गेल्या 20 वर्षांतील एफडीआयच्या गुंतवणुकीच्या निम्मी आहे. अमेरिकेनेही गेल्या 4 वर्षांमध्ये भारतामध्ये केलेली गुंतवणूक ही गेल्या 20 वर्षांच्या तुलनेत जवळपास निम्मी आहे. टॅक्स रिफॉर्म्स शिवाय आम्ही 37 कोटी लोकांना बँकींग प्रणालीशी जोडले आहे. ज्यामुळे पादर्शता वाढली आहे, असेही मोदी या वेळी म्हणाले.