Langur Posters in Moradabad: माकडांना हाकलण्यासाठी बस स्थानकांवर लंगूरचे फोटो आणि फायर साऊंड सेन्सर मशीन, मुरादाबाद येथील घटना
Langur Posters | (Photo Credits: ANI)

माकडांचा उपद्रव टाळण्यासाठी आणि त्यांना हुसकावून लावण्यासाठी उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यात एक अनोखी शक्कल लढविण्यात आली आहे. होय, माकडांना हाकलण्यासाठी उत्तर प्रदेशातील मुरादाबाद (Moradabad ) भागातील सरकारी बस स्थानकांवर चक्क लंगूरचे फोटो (Langur Photos)आणि फायर साउंड सेन्सर मशीन (Sound Sensor Machines) बसवण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांचा दावा असा की, बसस्थानकावर माकडांची भीती असली तरी फोटो आणि सेन्सर मशीन बसवल्याने ती कमी होते.

मुरादाबाद शहरातील परिवहन महामंडळाच्या प्रमुख बसस्थानकावर जागोजागी लंगूरचे मोठे फोटो अधिकाऱ्यांनी लावले आहेत. प्रामुख्याने हे फोटो बसस्थानकाच्या भींती, उंच झाडे, खांब, भिंती आणि छतावर हे फोटो चिकटवण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर बसस्थानकावर सेन्सर मशीनही बसवण्यात आले आहे. हा सगळा उद्योग केवळ माकडांना हुसकावून लावण्यासाठी केला जात आहे. (हेही वाचा, International Monkey Day 2019: माकडांबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या)

Langur Posters | (Photo Credits: ANI)

अधिकारी आणि काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, सेन्सर मशिनजवळ माकड येताच फायर लाईटसह गोळीबाराचा आवाज येतो आणि त्यामुळे माकडे पळून जातात. उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात 10-20 हजार प्रवासी बसस्थानकात येतात. अशा स्थितीत माकडे प्रवाशांचे नुकसान करत बसेसचे नुकसान करत असत. त्यामुळे प्रशासाने हा उपाय योजला आहे.

Langur Posters | (Photo Credits: ANI)

बसस्थानकात माकडांनी प्रवेश करताच ती प्रवाशांवर हल्ला करतात. त्यांच्या हातातील सामान, छोट्य पिशव्या, मोबाईल, पर्स अथवा इतर सामान हालवतात. ते घेऊन उंच छत अथवा झाडांवर जातात. काही ठिकाणी छोट्या मुलांना पळविण्याचेही उद्योग माकडांनी केले आहेत.

Langur Posters | (Photo Credits: ANI)

वृत्तसंस्था एएनआयला प्रतिक्रिया देताना उत्तर प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सहायक प्रादेशिक व्यवस्थापक (एआरएम), मुरादाबाद विभागाचे वित्त, बीएल मिश्रा म्हणाले, ही पद्धत राबवली जात आहे. लोकांमध्ये माकडांची प्रचंड भीती आहे. त्यामुळे ही भीती दूर करण्यासाठी आम्ही ही उपाययोजना केली आहे.