Petrol - Diesel Price | Image Use For Representational Purpose | File Photo

Petrol Diesel Price Today: आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमती स्वस्त झाल्या आहेत. त्यामुळेच डोमेस्टिक मार्केटमध्ये सुद्धा त्याचा परिणाम दिसून येत आहे. काल संपूर्ण देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताच बदल झाला नव्हता. पण आज पेट्रोल-डिझेलचे दर 11 पैसे तौ 14 पैशांपर्यंत कमी झाले आहेत. डिझेलच्या किंमतीत 12 पैशांनी घट झाली आहे. यापूर्वी गुरुवारी पेट्रोल-डिझेल या दोन्हीच्या किंमती कमी झाल्याचे दिसून आले होते.(LPG Gas Cylinder Price: विना अनुदानित एलपीजी गॅस सिलिंडर दरात किरकोळ वाढ; 1 जुलैपासून भाववाढ लागू)

पेट्रोल-डिझेलच्या किंमती दररोज बदलत असतात. तसेच देशातील प्रत्येक शहरातील याचे दर सुद्धा वेगवेगळे असतात. तर जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर(Petrol Diesel Price and Taxes: पेट्रोल, डिझेलवर कसा लागतो कर आणि वाढते इंधनाची किंमत? घ्या जाणून)

>>दिल्लीत आज पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट झाली आहे. पेट्रोलच्या किंमतीत 13 पैशांनी घट होत 81.86 रुपये प्रति लीटर झाले आहे. तसेच डिझेलचे दर 12 पैशांनी खाली येत 71.93 रुपये प्रति लीटर झाले आहे.

>>मुंबईत पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी झाल्या आहेत. पेट्रोल 13 पैशांनी स्वस्त झाले असून 88.51 रुपये प्रति लीटर वर पोहचले आहे. तर डिझेल 12 पैशांनी स्वस्त झाले असून 79.45 रुपये प्रति लीटर झाले आहे.

>>कोलकाता येथे सुद्धा पेट्रोल-डिझेलच्या किंमती घट झाली आहे. पेट्रोल 13 पैशांनी कमी होत 83.36 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 12 पैशांनी कमी होत 76.43 रुपये प्रति लीटवर आले आहे.

>>चेन्नईत आज पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी झाल्याचे दिसून आले आहे. पेट्रोलचे दर 11 पैशांनी कमी होत 84.85 रुपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर 12 पैशांनी कमी होत 77.22 रुपयांवर पोहचले आहेत.

दरम्यान, प्रत्येक दिवशी सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल होतो. त्यामुळे  सकाळी 6 वाजल्यापासून पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू केले जातात. या मध्ये एक्साइज ड्युटी, डिलर कमीशन आणि अन्य गोष्टींचा समावेश करुन पेट्रोल-डिझेलचे दर जवळजवळ दुप्पट होतात. याच सोबत आंतराराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत त्याच्या आधारावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल होतो.