Representational Image | (Photo Credits: PTI)

मोदी सरकार 2 चं पहिलं बजेट आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलं आहे. या अर्थसंकल्पाकडून सामान्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. आज बजेटमध्ये मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवताना 1% अधिक सरचार्ज भरावा लागणार आहे. त्यामुळे आता नव्या दरांमध्ये किमान 2 रूपयांनी पेट्रोल महाग होण्याची शक्यता आहे. तर सोनं आणि मौल्यवान रत्नांवर 12 % कस्टम ड्युटी आकारली जाणार असल्याने  सोनं खरेदी करणं आता महाग होणार आहे.मागील वर्षी मुंबईमध्ये पेट्रोलच्या दराने प्रति लीटर 80 रूपयांचा टप्पा पार केला होता. पहा केंद्रीय अर्थसंकल्प 2019-20 मधील महत्त्वाच्या घोषणा  

ANI Tweet

पेट्रोल, डिझेल आणि सोनं महागलं असलं तरीही घर घेणं सामान्यांसाठी आता अधिक सुकर केलं आहे. गृहकर्जांवर सरकारने सूट जाहीर केली आहे.