
Telangana Tunnel Collapse: तेलंगणाच्या (Telangana) नगरकुरनूल जिल्ह्यातील (Nagarkurnool District) श्रीशैलम लेफ्ट बँक कालव्याच्या (Srisailam Left Bank Canal, SLBC ) बांधकामाधीन भागात शनिवारी छताचा एक भाग कोसळला. या अपघातात किमान सहा कामगार अडकल्याची भीती आहे. पोलिसांनी सांगितले की, बांधकाम कंपनीचे एक पथक मूल्यांकनासाठी आत गेले होते. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, या बोगद्यात सहा ते आठ कामगार अडकल्याची भीती आहे.
अधिकाऱ्याने सांगितले की, 'काही कामगार कामासाठी आत गेले असताना बोगद्याच्या 12-13 किलोमीटर आत एका भागाचे छत कोसळल्याने ही घटना घडली.' तथापि, मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या प्रेसनोटमध्ये मृतांची संख्या उघड करण्यात आली नाही. (हेही वाचा -Goods Train Derailment in Odisha: टिटिलागरा यार्ड येथे मालगाडीचे 3 डबे रुळावरून घसरले; कोणतीही जीवितहानी नाही (Watch Video))
A Portion of Roof of the SLBC Tunnel Collapsed, many injured, few feared Trapped in Tunnel.
Reportedly around 3-meters roof of the #tunnel at #Srisailam Left Bank Canal (#SLBC) Project in #Nagarkurnool, collapsed at the 14th km mark, 5-7 workers feared trapped, most have safely… pic.twitter.com/DZ80NJ5lOi
— Surya Reddy (@jsuryareddy) February 22, 2025
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी परिस्थितीवर लक्ष ठेवून -
दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांना अपघातस्थळी पोहोचून मदतकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार, राज्याचे पाटबंधारे मंत्री एन. उत्तम कुमार रेड्डी, सिंचन बाबींवरील सरकारी सल्लागार आदित्यनाथ दास आणि इतर पाटबंधारे अधिकारी एका विशेष हेलिकॉप्टरने घटनास्थळी रवाना झाले आहेत.
तथापी, अपघाताबद्दल चिंता व्यक्त करताना, केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी घटनेची कारणे विचारली आणि अधिकाऱ्यांना अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासंदर्भात सूचना दिल्या. तसेच जखमींवर तात्काळ वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचना दिल्या.