Photo Credit- X

Goods Train Derailment in Odisha: ओडिशातील टिटिलागरा (Titilagarra) यार्डमध्ये शुक्रवारी रात्री रायपूरला जाणाऱ्या मालगाडी (Goods Train) चे तीन डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली. शुक्रवारी रात्री 8.30 वाजता रेल्वे स्थानकाजवळील टिटिलागरा यार्डमध्ये ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. संबलपूरच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) यांच्यासह पूर्व तटीय रेल्वेचे अधिकारी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आणि बोगी पूर्ववत करण्याचे काम करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Leopard Spotted in Pune: जुन्नर-नारायणगाव रस्त्यावर बिबट्याचा संचार; स्थानिक चिंतेत, अंधारात रात्री फिरतानाचा व्हिडिओ पहा (video))

टिटिलागढ यार्ड येथे मालगाडीचे 3 डबे रुळावरून घसरले

 

या डब्यांमध्ये लाल माती भरण्यात आली होती आणि ती सिमेंट प्लांटमध्ये नेण्यात येत होती. लाईन 8 वरून निघताना तीन डब्बे रुळावरून घसरले. मुख्य लाईन ताबडतोब पूर्ववत करण्यात आली. या मालगाडीचे सर्व डब्बे रुळावरून काढून टाकण्यात आले आहेत.

संबलपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) यांच्या मते, अप लाईन मोकळी आहे. प्रभावित डाउन लाईन शक्य तितक्या लवकर मोकळी केली जाईल. अपघात निवारण ट्रेनमधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी अडथळे असलेले रेल्वे रुळ साफ करण्याचे काम सुरू केले आहे.