देशभरात राष्ट्रीय महामार्गावर 450 रुग्णवाहिका तैनात असणार- नितीन गडकरी
Expressway (Photo Credits-Facebook)

केंद्र सरकारने 1 सप्टेंबर पासून वाहतुकीच्या नियमात बदल केले आहेत. केंद्रीय रस्ते आणि वाहतुक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी बदललेल्या वाहतुकीच्या नियमांमुळे रस्ते अपघातांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच एखादा व्यक्ती हे नियम मोडण्याचे धाडस सुद्धा करणार नाही. नितीन गडकरी यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीनुसार देशभरात राष्ट्रीय महामार्गांवर 450 रुग्णवाहिका तैनात असणार असल्याचे म्हटले आहे.

तसेच वाहतुकीचे नियम मोडल्यास दंडाची रक्कम यापूर्वी कमी होती. वाहतुकीचे नियम सर्सास मोडले जात होते. मात्र आता वाहतुकीचे नियम मोडल्यास दंडाची वसूली ही दुप्पटीने करण्यात आली आहे. यामुळे आता लोकांमध्ये वाहतुकीचे नियम मोडल्यास भीती निर्माण होईल म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.(Video : नितीन गडकरी यांचा RTO अधिकाऱ्यांना अल्टिमेटम; लोकांच्या समस्या ऐकल्या नाही तर लोकांकडूनच धुलाई होणार)

तसेच सरकार लवकरच रोड सेफ्टी बोर्ड बनवण्याच्या तयारीत आहेत. हे सेफ्टी बोर्ड रस्ते वाहतुकीच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवून असणार आहेत. त्याचसोबत रस्ते अधिक सुरक्षित बनवण्यासाठी एशिय डेव्हलपमेट बँक आणि वर्ल्ड बँकेकडून 14 हजार कोटी रुपयांची मदत मागितली आहे. वाहनांमुळे होणाऱ्या प्रदुषणावर सुद्धा सरकारची नजर असणार आहे.