Video : नितीन गडकरी यांचा RTO अधिकाऱ्यांना अल्टिमेटम; लोकांच्या समस्या ऐकल्या नाही तर लोकांकडूनच धुलाई होणार
Nitin Gadkari(Photo Credit: Twitter)

केंद्रीय मंत्री  (Union Minister) व भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नागपूर मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS)  संलग्न असलेल्या लघु उद्याेग भारती संमेलनाला शनिवारी उपस्थिती लावली. याठिकाणी आपल्या भाषणातून गडकरी यांनी आरटीओच्या (RTO) अधिकाऱ्यांची पुरेपूर कानउघाडणी केली. नवउद्योजकांना वारंवार अधिकाऱ्यांकडून त्रास होत असल्याच्या तक्रारी येत आहेत, लोकांच्या कित्येक समस्या अजूनही सोडवायच्या बाकी आहेत त्यामुळेयावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा अन्यथा लाेकांना कायदा हातात घेऊन तुमची धुलाई करण्यास सांगेन असे गडकरी म्हणाले. याशिवाय, जी व्यवस्था न्याय देत नाही तिला आपण फेकून द्यायला हवं असं आपल्या शिक्षकांनी शिकवल्याचे सांगत आपण या कारवायांसाठी परिवहन विभागाच्या बैठकीत आठ दिवसांची मुदत दिल्याचे देखील त्यांनी सांगितले. (BMC च्या बँक खात्यात 58 हजार कोटी; तरीही मुंबई दरवर्षी तुंबते ,नितीन गडकरी यांचा शिवसेनेला टोला)

गडकरींनी आपल्या भाषणातून लालफितीच्या कारभारावर देखील ताशेरे ओढले. "आपल्याकडे लालफितीचा कारभार आहे. अनेक अधिकारी लाचखोर घेतात. पण मी त्यांना आठवण करून देऊ इच्छितो की तुम्ही सरकारी नाेकर आहात. मी लाेकांमधून निवडून आलाे आहे. मी लाेकांना उत्तर देण्यास बांधील आहे. जर तुम्ही चाेरी करत असाल तर मी तुम्हाला एक चाेर म्हणीन. अशा शब्दात गडकरींनी अधिकाऱ्यांना सुनावले. तसेच या अधिवेशनात सहभागी उद्योजकांना संबोधून बोलत असताना, तुम्ही कोणतीही भिती मनात न बाळगता व्यवसाय करा अधिकारी तुम्हाला त्रास देऊ शकणार नाहीत असा विश्वास गडकरींनी दिला. .

पहा गडकरींच्या भाषणाची झलक

दरम्यान,नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली त्यांना सोपवण्यात आलेल्या MSME विषयी बोलताना त्यांनी आजवर या प्रकल्पातून 11.50 कोटी तरुणांना नोकरी मिळाल्याचे सांगितले, तसेच येत्या पाच वर्षात या आकड्यात आणखीन 5 कोटींची वाढ होईल असा दावा देखील त्यांनी केला. नितीन गडकरी हे अतिशय स्पष्टवक्ते म्हणून ख्यात आहेत या कार्यक्रमात त्यांनी केलेले भाषण हे त्याचेच उदाहरण असले तरी यामुळे नवीन वाद निर्माण हाेण्याची शक्यता आहे.