नोएडा: वाहतूक पोलिसांनी चलान कापण्याची धमकी दिल्याने वाहन चालकाला हृदयविकाराचा झटका, मृत्यू
Image For Representation (Photo Credits-Facebook)

देशात 1 सप्टेंबर पासून वाहतुकीच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. तसेच नियम तोडल्यावर दंडाची रक्कम सुद्धा 10 पट अधिक वसूल केली जात आहे. त्यामुळे आता वाहतूकीचे नियम तोडण्याने कटाक्षाने टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील विविध ठिकाणाहून आतापर्यंत वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई करत लाखो रुपयांची वसूली केली आहे. मात्र नोएडा (Noida) येथे वाहतूक पोलिसांनी चलान कापण्याची धमकी दिल्याने चक्क चालकाला हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.

मूलचंद शर्मा हे इंदिरापुरम येथे जाण्यासाठी सहपरिवारासह कारमधून निघाले होते. तसेच मूलचंद यांच्या बाजूला त्यांचा मुलगा गौरव हा गाडी चालवत होता. परंतु काही अंतरावर गेले असता एका वाहतूक पोलिसांनी त्याला गाडी बाजूला घेण्यास सांगितले. त्यानुसार गौरव याने गाडी बाजूला घेत का थांबवले याबाबत वाहतूक पोलिसाला विचारले. त्यावेळी पोलिसाने चलान आणि गाडी सीज करण्याची धमकी देत फोटो काढण्यास सुरुवात केली. त्याचवेळी गौरव याला चक्कर येत तेथच तो कोसळला. तर गौरव याला चक्कर येऊन खाली पडल्याचे वाहतूक पोलिसाने पाहताच त्याने तेथून पळ काढला.(लखनऊ: लुंगी नेसून ट्रक चालविणे पडणार महागात, ट्रकचालकास भरावा लागणार 2000 रुपयांचा दंड)

तर रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या एका व्यक्तीने तातडीने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केसे. मात्र डॉक्टरांनी प्रथम त्याच्यावर उपचार करण्यासाठी नकार दिल्याने गौरव याला पुन्हा दुसरीकडे नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याची तपासले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. या प्रकारामुळे पीएम नरेंद्र मोदी आणि सीएम यांच्याकडे न्याय मिळावा यासाठी परिवाराने आता मागणी करत आहे.