Noida: प्रसिद्ध मुर्तिकार राम सुतार यांच्या घरी चोरी, 26 लाखांच्या रोकडसह मौल्यवान वस्तू घेऊन पळाला नोकर
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- Pixabay)

नोएडा सेक्टर 19 मध्ये राहणारे प्रसिद्ध मुर्तिकार पद्मश्री व पद्मा भूषणने सम्मानित केलेले राम वनजी सुतार यांच्या घरी चोरी झाली आहे. तर नोकराने 26 लाख रुपयांचा कॅश आणि लाख रुपयांचे दागिने घेऊन पळ काढला आहे. नोकर खुप वेळ घरी आला नाही त्यामुळे सेक्टर 20 पोलिसांना याबद्दल कळवण्यात आले. या प्रकरणी पोलिसांकडून तपास केला जात आहे. पोलिसांच्या मते, राम सुतार यांचा मुलगा अनिल सुतार मुर्तिकार आहे. चार दिवसांपूर्वी दिल्ली येथील एक प्लेसमेंट एजेंसी मेरी नीड्स मधून घरगुती नोकर ओडिशा येथील रहिवाशी असलेल्या मदन मोहन दास याची नोकर म्हणून निवड केली होती.

मंगळवारी संध्याकाळी सेक्टर19 स्थित घरी राम सुतार, त्यांची नात आणि दोन नोकर होते. तर नातू ऑफिसला गेला होत. त्यावेळी मदन मोहन याने घरातील एका खोलीत घुसून कपाटाचा दरवाजा तोडत त्यात ठेवण्यात आलेली 26 लाखांची रोकड आणि मौल्यवान दागिने घेऊन पळाला होत. हा प्रकार घडल्यानंतर तातडीने पोलिसांना कळवण्यात आले.(Chief Justice Sharad A Bobde: न्यायमूर्ती शरद बोबडे म्हणाले, 'महिलांचा सर्वोच्च सन्मान करतो, बलात्काऱ्यासोबत विवाह करण्याचा प्रस्ताव कधीच नाही दिला')

दरम्यान, मुर्तिकार अनिल सुतार हे मंगळवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सुद्धा होती. एका प्रोजेक्ट संदर्भात भेटण्यासाठीच अनिल सुतार उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले होते. परंतु मंगळारी घरी राम सुतार, मुलगा समीर आणि मुलगी होती. पोलिसांकडून राम सुतार यांच्या घरी चोरी झाल्याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहत आहेत. त्याचसोबत जेथून नोकराची निवड करण्यात आली होती त्या कंपनीच्या संचालकांची सुद्धा चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.

तर अनिल सुतार आणि राम सुतार हे अयोध्येतील राम मंदिरासाठी भगवान रामाची 251 मीटर उंचीची मुर्ति तयार करणार आहेत. मुर्ति तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपण्यात आले आहे. यापूर्वी त्यांनी गुजरात मधील सरदार वल्लभभाई पटेल यांची 183 मीटर उंचीची मुर्ति तयार केी होती. या व्यतिरिक्त सुतार यांनी काही अन्य प्रसिद्ध मुर्त्या सुद्धा बनवल्या आहेत.