Nitin Gadkari on Farmers Protest: शेतक-यांची दिशाभूल करुन त्यांच्या आंदोलनाचा दुरुपयोग करण्याचा काही घटकांचा प्रयत्न- नितीन गडकरी
Union minister Nitin Gadkari (Photo Credits: IANS)

केंद्र सरकारच्या (Central Government) नव्या कृषी विधेयकांविरोधात नवी दिल्लीत (New Delhi) मागील 19 दिवसांपासून शेतकरी संघटना आंदोलनास (Farmers Protest) बसल्या आहेत. यात अनेक देशभरातील अनेक शेतक-यांचा समावेश आहे. ही विधेयकं रद्द करावी अशी मागणी शेतक-यांकडून होतेय. यासंदर्भात केंद्र सरकार आणि शेतक-यांच्या अनेक बैठका देखील झाल्या. मात्र त्यावर योग्य तो तोडगा निघाला नाही. या सर्वावर भाष्य करत केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी शेतक-यांनी ही विधेयकं नेमकी काय आहेत हे आधी समजून घ्यावे असे आवाहन शेतक-यांना केले आहे. "आमचे सरकार शेतक-यांच्या बाजूने असून शेतक-यांच्या हिताचाच विचार करणार" असेही त्यांनी सांगितले आहे.

"आम्ही शेतक-यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही. मात्र समाजात असे काही घटक आहेत जे शेतक-यांची दिशाभूल करुन या आंदोलनाचा दुरुपयोग करत आहे. हे पूर्णत: चुकीचे आहे. त्यासाठी शेतक-यांना ही कृषी विधेयकं नीट समजून घेणे गरजेचे आहे" असेही नितीन गडकरी म्हणाले.

ते पुढे असेही म्हणाले की, 'ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे या आंदोलनात सहभागी होतील असे आम्हाला वाटत नाही. कारण आम्ही काहीही शेतक-यांच्या विरोधात करत नाही आहोत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.हेदेखील वाचा- Anna Hazare Wrote to Narendra Singh Tomar: शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास अन्नत्याग करण्यासंदर्भात अण्णा हजारे यांचे नरेंद्र सिंह तोमर यांना पत्र

आपले प्रोडक्ट बाजारात विकणे हा शेतक-यांचा अधिकार आहे. त्यामुळे एकमेकांशी संवाद होणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास गैरसमज जास्त होतील. त्यामुळे योग्य ती चर्चा झाल्यास त्यावर योग्य तोडगा निघून हा प्रश्न मार्गी लागू शकतो' असेही गडकरी म्हणाले.यामुळेच आमचे सरकार शेतक-यांची समजूत काढत त्यांना ही विधेयकं नीट समजवण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून हा प्रश्न लवकर मार्गी लागेल असेही ते म्हणाले.